सुबोध भावेला पाहताच गौरीश शिपुरकरला धडकी भरायची; वाचा सेटवरचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 03:16 PM2021-11-29T15:16:59+5:302021-11-29T15:20:56+5:30
कोरोना महामारीमुळे विजेता सिनेमाचे पुन:प्रदर्शन करण्यात येत आहे.
अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता 'गौरीश शिपुरकर', आता 'विजेता' सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, 'सुभाष घई' यांच्या ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश शिपुरकर रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, तर या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अभिनेता गौरीश शिपुरकरने सुबोध भावे यांच्यासोबत नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता गौरीश शिपुरकर विजेता सिनेमाविषयी सांगतो, कोरोना महामारीमुळे विजेता सिनेमाचे पुन:प्रदर्शन करण्यात येत आहे. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. शिवाय या सिनेमातील सगळेच कलाकार खूप अनुभवी आहेत. सुबोध भावे, पूजा सावंत, माधव देवचके, सुशांत शेलार यांच्यासोबतचे सेटवरचे अनुभव खूप स्पेशल आहेत."
अभिनेता गौरीश, सुबोध भावे यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर करताना सांगतो, “विजेता सिनेमात ‘सुबोध भावे’ सोबत काम करण्याची संधी मिळणं. हेच माझ्यासाठी खूप खास आहे. ज्यांना तुम्ही लहानपणापासून रंगमंच ते रूपेरी पडद्यावर पाहिल. ज्यांची नाटकं आणि सिनेमे बघून मी मोठा झालो. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं, शिवाय विजेता सिनेमाच्या सेटवर त्यांचा अभिनय जवळून अनुभवता येणं, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.”
पुढे तो म्हणतो, "विजेता सिनेमात माझा आणि सुबोध भावेंचा एक सोलो सीन आहे. त्यामध्ये मी आणि सुबोध भावे आहोत. माझे डायलॉग पाठ होते. पण त्यांच्यासमोर सीन करताना माझे शब्दच फुटत नव्हते. त्यांचा अभिनय पाहून मी आजवर शिकत आलो आणि आता त्यांच्यासमोर डायलॉग बोलताना मनात धाकधूक होत होती. मी त्यांना जेव्हा जेव्हा सीनबद्दल विचारत होतो त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. त्यामुळे हा सुंदर किस्सा माझ्या कायम स्मरणात राहील."