पुनर्जन्माची थरारक प्रेमकथा 'भेद' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 08:37 PM2019-02-06T20:37:42+5:302019-02-06T20:38:05+5:30
पुनर्जन्माची आणि प्रेमाच्या ध्यासाची खिळवून टाकणारी गोष्ट सांगणारा ‘भेद’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेमाच्या आड जात,धर्म,पैसा,संपती येत नाही,प्रेमाच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी प्रेम यशस्वी होतेच. अशीच एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाच्या ध्यासाची खिळवून टाकणारी गोष्ट सांगणारा ‘भेद’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा संगीतमय चित्रपट असून येत्या १५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सुचिता जाचक यांच्या ग्रीन चिली मुव्ही इंटरनॅशनल निर्मित ‘भेद’चे दिग्दर्शन प्रमोद शिरभाते यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या मातीतले अस्सलपणा असलेली दोन पिढ्यांमध्ये रंगणारी ही प्रेमाची गोष्ट, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. शाम-राधा, मनाली-भिवा ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करतील असा विश्वास निर्मात्यांना आहे. ही प्रेमाची गोष्ट संगीतमय असून चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. ही सहा गाणी लाईव्ह ऑन म्युझिक या मराठी युट्यूब चॅनलवर दिसणार आहेत त्यातले ‘कोण शिट्या वाजवतो’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले असून लोकप्रिय हिंदी अभिनेत्री पूनम पांडे या गाण्याच्या निमित्ताने मराठीत पदार्पण करते आहे.पूनम पांडे आपल्या या पदार्पणाबद्दल विशेष उत्सुक आहे.
या चित्रपटात अजित गाडे, श्लेषा मिश्रा,अभिषेक चौहान आणि डॉ.राजेश बक्षी मुख्य भूमिकेत आहेत.