​रिअ‍ॅलिटी शोमधून खरी ओळख मिळाली'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2016 01:38 PM2016-12-08T13:38:36+5:302016-12-08T13:38:36+5:30

         priyanka londhe  देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही.... या गाण्यातील आवाजाने आजही प्रेक्षकांच्या  काळजाचा घाव घेतल्या ...

Received real identity from reality show ' | ​रिअ‍ॅलिटी शोमधून खरी ओळख मिळाली'

​रिअ‍ॅलिटी शोमधून खरी ओळख मिळाली'

googlenewsNext
 
     priyanka londhe

 देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही.... या गाण्यातील आवाजाने आजही प्रेक्षकांच्या  काळजाचा घाव घेतल्या शिवाय राहत नाही. स्वत:च्या आवाजाची एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अनेक दर्जेदार गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांच्या मनावर तो राज्य करीत आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा गायक म्हणून ज्याच्याकडे पाहीले जाते, तो म्हणजे  आदर्श शिंदे. गावरान बाज असलेली अनेक गाणी एकदम झक्कास अंदाजात गाणारा आदर्श त्याच्या गायनाच्या प्रवासा विषयी लोकमत सीएनएक्सशी भरभरुन बोलला. 

 गायनाची परंपरा तर तुझ्या घरातच आहे, पण तुझ्यात गायनाची आवड कशी आणि कधीपासून निर्माण झाली?
-: कुटुंबात संगीत असल्यामुळे लहानपणापासून संगीत ऐकत मोठे झालो. हे लोक काहीतरी छान करतायत, मस्त गातायत असे वाटायचे अन मग तशीच आवड निर्माण झाली. मी शाळेमध्ये गायन स्पर्धेत भाग घ्यायचो आणि मला बक्षिसे मिळायची. मग घरात कळले की मी गायनात चांगला आहे त्यानंतर काका आणि वडिलांनी मला गाण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 

 तुझ्या घरातच प्रसिद्ध गायक आहेत, तरी पण तुला चित्रपटसृष्टीत येताना स्ट्रगल करावा लागला का?
 नक्कीच मला स्ट्रगल करावा लागला आहे. लोकांना वाटत असेल की हा आनंद शिंदे यांचा मुलगा आहे, त्यामुळे त्याला सर्व काही सहज मिळाले असेल. पण तसे अजिबातच नाहीये. वडिलांनी मला आधीच सांगितलं होत की, आम्ही तुझी शिफारस कुठेही करणार नाही. ज्याप्रकारे आम्ही शुन्यातून जग निर्माण केले आहे, तुलाही तसेच करावे लागेल. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की तुला तुझ्या आवाजामुळे प्रेक्षकांनी ओळखले पाहीजे. त्यामुळे स्वत:चा जॉनर तयार कर. 

 तू रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होतास, त्याचा तुझ्या करिअरसाठी फायदा झाला का?
-: हो नक्कीच मला फायदा झाला, कारण त्या शो आधी मी ४५ गाणी केली होती. पण तरीही मला ओळख मिळाली नव्हती. माझ्या वडिलांना त्यावेळी टेन्शन यायाचे की आदशर्ची गाणी हिट झाली नाही तर काय होणार. पण त्या शो मुळे मला फेस व्हॅल्यु मिळाली. आनंद शिंदे यांचा मुलगा कोण हे प्रेक्षकांना तेव्हा समजले. रिअॅलिटी शो नंतर माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

 
पूर्वीची गाणी आणि आताची गाणी यात फार बदल झालेला दिसतो, आता प्रेक्षकांना हटके गाणी आवडू लागली आहेत. त्याबद्दल काय सांगशील?
- मला वाटते की हा खरेच खूप चांगला चेंज आहे. गायकांनाही त्याचा निश्चितच फायदा होतो. गायकांना आता वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायला मिळतात. मला स्वत:ला देखील एकाच जॉनरमध्ये गायला आवडत नाही. सध्याच्या गाण्यांमधील जे वेगळेपण आहे त्याचा फायदा गायकांना होतोय. अनेक प्रकारची गाणी गायची संधी त्यांना मिळतेय. 

Web Title: Received real identity from reality show '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.