रीना अगरवाल असं का म्हणतेय "तू तुझी नजर बदल",काय आहे या मागचं कारण,जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 08:46 AM2018-03-08T08:46:23+5:302018-03-08T14:16:23+5:30

भारत ही पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे,देश जरी पुरुष प्रधान असला तरी महिला आता आघाडीवर असताना दिसत आहे. महिला ...

Reena Agarwal says, "Why do you change your eyes", what is the reason behind this, Read the detailed explanation | रीना अगरवाल असं का म्हणतेय "तू तुझी नजर बदल",काय आहे या मागचं कारण,जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

रीना अगरवाल असं का म्हणतेय "तू तुझी नजर बदल",काय आहे या मागचं कारण,जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

googlenewsNext
रत ही पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे,देश जरी पुरुष प्रधान असला तरी महिला आता आघाडीवर असताना दिसत आहे. महिला ही फक्त "चूल आणि मूल" पर्यंत मर्यादित राहिलेली नाही.एकविसाव्या शतकातील महिला आता पुरुषांच्या सोबतीला आपापल्या ध्येयाकडे पुढे सरसावताना दिसत आहे.आजचं युग हे डिजिटल युग आहे.नवनवीन संशोधनामुळे माणसांत कमालीची प्रगती आपणास पहावयास मिळते.चंदेरी दुनिया म्हणजेच आपली सिनेसृष्टीमध्ये झालेला आमूलाग्र बदल हे त्यापैकीच एक.पूर्वी स्त्रिया सिनेमामध्ये काम करण्यास तयार नाही व्हायच्या त्यामुळे परिणामी पुरुषांना महिलेच्या वेशात अभिनय करावा लागत असे पण आता बघायला गेलं तर,सिनेसृष्टीच्या संकल्पनेतही मोठा बदल झालेला दिसतोय.

आजचा समाज स्त्री पुरुष समानता या तत्वावर चालतोय .स्त्री आणि पुरुष यात कोणतेही भेदभाव केले जात नाही. तरीही एका मर्यादेनंतर मुलींवर बोट उठवले जाते.आजचा भारत जरी पुढे गेला असला तरी काही गोष्टींमुळे महिलांना नेहमीच खालीपणा घ्यावा लागतो. कधीकधी चित्रपटजगात वावरणाऱ्या महिलावर्गाला खासकरून विचित्र असं ऐकावं लागतं. त्यांच्या कपड्यांवरून अथवा त्यांच्या वर्ण, उंची, बांधा यावरून इतर पुरुष मंडळी त्यांची खिल्ली उडवताना दिसतात.

जागतिक महिला दिन हा स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा दिवस आहे.आपल्या आयुष्यात स्त्री ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे ; डिजिटल मीडिया मुळे लोक जवळ तर आलेत पण यामुळे महिलांचा तोटा ही झालेला दिसून येतो. मुलींच्या फोटोंवर अश्लील कमेंट किंवा ती रस्त्यांवर जात जरी असली तरी तिच्या मागून तिला तिने घातलेल्या कपड्यांवरून चिडवणे, हे प्रकार सर्रास घडतात आणि या छेडछाडीचे रूप नंतर बलात्कार आणि विनयभंगाकडे वळते. 

मुलीने कोणते कपडे घालावे किंवा तिने काय करावे हा सर्वस्व तिचा हक्क आहे.तिला या बद्दल कोणीही काहीच बोलू शकत नाही. हेच सांगण्यासाठी आज जागतिक महिलादिनाच्या प्रसंगी अभिनेत्री रीना अगरवाल हिने तिच्या सोशल मीडियावर #IWillNotChangeTeriNazarBadal हा हॅशटॅग वापरून एक पोस्ट शेयर केली ज्यामध्ये तिने स्पष्ट केले आहे की "मी जशी आहे तशीच राहणार .... तू तुझी नजर बदल." महिलादिनी या पोस्टचा एवढा परिणाम झाला की याच हॅशटॅग चा वापर करून इतर तरुणींनीसुद्धा या चळवळीत भाग घेतला. " आपण व्यक्तीला त्याच्या बाह्यरूपापेक्षा त्याच्या अंगी असलेल्या कर्तृत्वाकडे पाहून त्याविषयी बोलावे. मुलींना नेहमीच "तू अशीच आहे, ती तशीच आहे" असं बोलून हिनवलं जातं त्यामुळे मुलींचा आत्मविश्वास कुठेतरी खालावतो.... स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जगात नारीशक्तीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही असा माझा समज आहे. ही संकल्पना राबवण्याचा हेतूच हा होता की मुलींचा आत्मविश्वास अजून बळकट करणे हा होता " असे या संकल्पनेबद्दल रीना सांगते.ही चळवळ खरच खूप महत्त्वाची आहे कारण प्रत्येक मुलीला यामुळे एक जिद्द मिळाली आणि ती ठामपणे म्हणतेय की, "तू तुझी नजर बदल !"

Web Title: Reena Agarwal says, "Why do you change your eyes", what is the reason behind this, Read the detailed explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.