मैत्री या नात्यावर भाष्य करणारी रिफ्रेशिंग कथा 'फ्रेंड्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:23+5:302016-02-12T06:07:56+5:30

मैत्रीवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येऊन गेलेत. प्रत्येक सिनेमात मैत्रीची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. आता आणखी एक दोन मित्रांची ...

Refreshing story 'Friends' that annotate friendship | मैत्री या नात्यावर भाष्य करणारी रिफ्रेशिंग कथा 'फ्रेंड्स'

मैत्री या नात्यावर भाष्य करणारी रिफ्रेशिंग कथा 'फ्रेंड्स'

googlenewsNext
त्रीवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येऊन गेलेत. प्रत्येक सिनेमात मैत्रीची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. आता आणखी एक दोन मित्रांची आगळीवेगळी कथा असलेला 'फ्रेंड्स' हा सिनेमा येऊ घातला आहे. ज्यात तुम्हाला दोन मित्रांची धमाल-मस्ती, मजा बघायला मिळणार आहे. मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी आणि सचित पाटील हे दोघे यात मुख्य भूमिकेत आहेत.

दोन मोठे स्टार एकत्र बघायला मिळणार, या गोष्टीनेच सध्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्सुकता बघायला मिळत आहे. हा सिनेमा १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

आर. मधेश यांनीच या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळलीये. मित्र हे असं व्यक्तिमत्त्व आहे, जे प्रत्येकाच्याच जीवनात असतं. मैत्री प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा अर्थ देते. मैत्रीत भांडणं असतातच, पण त्याहूनही जास्त असतं एकमेकांवरच प्रेम आणि एकमेकांवरचा विश्‍वास.. त्यामुळेच मैत्रीवर आधारित सिनेमे काढण्याचा सिने इंडस्ट्रीतील निर्मात्यांना मोह आवरता येत नाही.

अशाच दोन जीवलग मित्रांची, त्यांची मैत्रीची, सुख-दु:खांची कहाणी 'फ्रेंड्स'मधून रूपेरी पडद्यावर येत आहे. स्वप्निल जोशी आणि सचित पाटील यांच्यासोबत या सिनेमात गौरी नलावडे ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीच यातील गाणी सुरपहीट ठरली असून, 'प्रेमिका' हे स्वप्निल जोशीवर चित्रीत गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. अमित राज, पंकज पडघन आणि नीलेश मोहरीर या तीन दिग्गज संगीतकारांनी संगीत दिले असून, मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत.

संजय केळापुरे, आर. मधेश, प्रेम व्यास आणि मनीष चंदा यांची निर्मिती असून, कथा आर. मधेश, संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. सहायक निर्माते शिव राजपुत्रा हे आहेत. सिनेमाचे प्रमोशन पार्टनर्स अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार हे आहेत. अँक्शन, रोमान्स, फ्रेंडशिप, इमोशन असा मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला असून, येत्या १५ जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.

Web Title: Refreshing story 'Friends' that annotate friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.