'बालक-पालक' मधील डॉली तुम्हाला आठवतेय का? ट्रान्सफॉर्मेश पाहून व्हाल थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 04:05 PM2021-09-28T16:05:04+5:302021-09-28T16:11:42+5:30

'बालक पालक' या चित्रपटानंतर शाश्वतीने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ आणि ‘चाहूल’,'सिंधू' या टीव्ही मालिका केल्या. तिने ‘देहभान’ या नाटकामध्ये सुद्धा काम केलेले आहे.

Remember Dolly Aka Shashwati Pimplikar from Balak Palak, This is how she looks now, check her transformation pics | 'बालक-पालक' मधील डॉली तुम्हाला आठवतेय का? ट्रान्सफॉर्मेश पाहून व्हाल थक्क

'बालक-पालक' मधील डॉली तुम्हाला आठवतेय का? ट्रान्सफॉर्मेश पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

रुपेरी पडद्यावर  2013 साली सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘बालकपालक’. दिग्दर्शक रवी जाधवचा हा चित्रपट सेक्स एज्युकेशनवर भाष्य करण्यात आले होते.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवली होती. सई ताम्हणकर, प्रथमेश परब, मदन देवधर यांच्यासह शाश्वती पिंपळीकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. शाश्वती पिंपळीकर हिने या चित्रपटात डॉली ही व्यक्तिरेखा साकारली होती.

या चित्रपटात भूमिका साकारली त्यावेळी  शाश्वती नववीत शिकत होती. या चित्रपटामुळे तिला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. मात्र आता हीच डॉली सध्या करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.

'बालक पालक' या चित्रपटानंतर शाश्वतीने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ आणि ‘चाहूल’,'सिंधू' या टीव्ही मालिका केल्या. तिने ‘देहभान’ या नाटकामध्ये सुद्धा काम केले आहे. त्यानंतर तिने ‘मधु इथे चंद्र तिथे’, ‘हेडलाईन’ या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.

शाश्वतीनेही तिचा मेकओव्हर करत नवीन लूक मिळवला आहे.आता ती कमालीची सुंदर दिसते. पूर्वीचा लूक आणि आत्ताचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल इतकी ती सुंदर दिसते.तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.

इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. 


तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.नुशाश्वतीने फोटोग्राफर राजेंद्र करमरकरशी लग्न केलं आहे. हा लग्नसोहळा सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटोही तिने चाहत्यांसह शेअर केले होते. मध्यंतरी कामाच्या शोधात असल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती त्यावेळी तिची प्रचंड चर्चा झाली होती. 
 

Web Title: Remember Dolly Aka Shashwati Pimplikar from Balak Palak, This is how she looks now, check her transformation pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.