लक्ष्मीकांत बेर्डेंच्या 'झपाटलेला'मधील 'कुबड्या खविस' आठवतोय का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:00 AM2022-11-09T07:00:00+5:302022-11-09T07:00:00+5:30
Zapatlela : महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते.
नव्वदचं दशक मराठी चित्रपटांसाठी सुवर्ण काळ मानला जातो. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्री गाजवली. महेश कोठारे यांचे अनेक चित्रपट ९० च्या दशकात सुपरहिट ठरले होते. महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. इतकेच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते.
कुबड्या खविसची भूमिका अभिनेता बिपीन वर्टी यांनी साकारली होती. विशेष म्हणजे या कलाकाराने माझा छकुला सिनेमात गिधाड गॅंग मधला प्रमुख व्हिलन साकारला होता. बिपीन वर्टी यांना तुम्ही महेश कोठारेच्या अनेक चित्रपटांत पाहिले आहे. अगदी हट्टाकट्टा दिसणारा हा कलाकार वेगळ्या गेटअप मुळे अजिबात ओळखू येत नाही.
माझा छकुला, झपाटलेला चित्रपटाव्यतिरिक्त आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, धुमधडाका, गंमत जंमत सारख्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. फेका फेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
आज बिपीन वर्टी हयात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अशा अनेक भूमिका अजरामर झालेल्या पाहायला मिळतात. जोवर ते हयात होते तोवर जवळपास सर्वच चित्रपटांत त्यांनी महेश कोठारेंना साथ दिली होती. झपाटलेला मध्ये कुबड्या खविस म्हणून ते परिचित आहेच आणि इकडे गिधाड बनून त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.