पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत व्यतित केलेल्या आठवणीत रमली मानसी नाईक, फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:20 IST2024-04-22T15:20:29+5:302024-04-22T15:20:29+5:30
Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ती पुन्हा प्रेमात पडली आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या नव्या प्रेमाबद्दल सांगितले.

पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत व्यतित केलेल्या आठवणीत रमली मानसी नाईक, फोटो शेअर करत म्हणाली...
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ती पुन्हा प्रेमात पडली आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या नव्या प्रेमाबद्दल सांगितले. त्यानंतर तिच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीने एक पोस्ट शेअर केली. तिचा हा खास व्यक्ती पॅरिसमध्ये असतो. यंदाचा तिचा वाढदिवसदेखील तिने पॅरिसमध्ये साजरा केला. त्यानंतर ती भारतात परतली आहे. दरम्यान आता ती खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत पॅरिसमधील आठवणींमध्ये रमली आहे.
मानसीने अलिकडेच इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने खास व्यक्ती सोबत फोटो रिपोस्ट करत ती पुन्हा प्रेमात पडल्याचा खुलासा केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, माझं प्रेम मी एका फ्रेममध्ये कॅप्चर करत आहे. या फोटोमध्ये ते दोघे आयफेल टॉवरसमोर उभे असून त्यांनी छान सेल्फी क्लिक केला होता. त्यानंतर आता ती पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर करत तिथल्या आठवणींमध्ये रमली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, पॅरिसियन जादू: क्षणांना आठवणींमध्ये बदलले.
कोण आहे मानसीचा बॉयफ्रेंड?
मानसीच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव आहे. तो अंतराळ शास्त्रज्ञ आहे. तीदेखील जर्मनीत स्थित होणार असल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले.
एका मुलाखतीत केला होता बॉयफ्रेंडबद्दलचा खुलासा
मानसीने तिचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला आयफेल टॉवरच्या इथे नेण्यात आले होते. तसेच तिला फॉसिल वॉच बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालं होतं. त्यामुळे हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीविषयी पहिल्यांदाच भाष्य केले. ती म्हणाली की, मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन. पण, बरं वाटलं की असा कोणीतरी आहे जो तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायला काहीही करु शकतो.