'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:46 PM2019-06-15T17:46:46+5:302019-06-15T17:47:50+5:30
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे व फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे व फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री रेणुका शहाणे देखील आपले मत परखडपणे सोशल मीडियावर व्यक्त करीत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण, त्या ट्रोल करणाऱ्या व्यक्तींनादेखील सडेतोड उत्तर देताना दिसतात. मात्र नुकतेच त्या शहाणे आडनावामुळे त्यांना सोशल मीडियावर नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. या शोमध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे सहभागी झाल्या आहेत. पण, सोशल मीडियावर किशोरी शहाणे ऐवजी रेणुका शहाणे यांना टॅग केलं जाते. त्यामुळेच त्रस्त झालेल्या रेणुका शहाणे यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केलाय.
त्यांनी ट्विट केले की, ‘मी किशोरी शहाणे नाही आणि मी बिग बाॅसमध्ये नाही. माझा ह्या कशाशीच काहीही संबंध नाही! कृपया मला टॅग करू नका. समाज माध्यमांचा गैरवापर टाळा. आणि कृपया विचार करा.’
चक्क हॅशटॅग shameonrenukaandparag चालवता? किशोरी आणि रेणुका मध्ये काहीच अंतर दिसत नाही का तुम्हाला? बघा नं! तिचं नाव "कि" नी सुरू होतं तर माझ्या नावाचा शेवट "का" नी होतो! तिच्या नावाचा शेवट "री" नी होतो आणि माझ्या नावाची सुरूवात "रे" नी होते. बघा!जमलं तर फरक शोधा, खूप सापडतील 🙏🏽 https://t.co/F996XTc7wp
— Renuka Shahane (@renukash) June 15, 2019
एका नेटकऱ्याने बिग बॉसमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीवर ट्विट केले होते त्यावर, ‘बिग बाॅस मध्ये जाणाऱ्या लोकांकडून शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार, ही अपेक्षा करणे त्या कार्यक्रमाच्या रूपरेखेशी सुसंगत आहे का?’ असं रेणुका शहाणे म्हणाल्या.
रेणुका शहाणे व किशोरी शहाणे यांच्या आडनावामुळे प्रेक्षकांचा गोंधळ उडत आहे. मात्र नावातील फरक लक्षात आणून देणारे एक ट्विटही रेणुका शहाणेंनी केलं आहे. ‘चक्क हॅशटॅग shameonrenukaandparag चालवता? किशोरी आणि रेणुका मध्ये काहीच अंतर दिसत नाही का तुम्हाला? बघा ना! तिचं नाव “कि” नी सुरू होतं तर माझ्या नावाचा शेवट “का” नी होतो! तिच्या नावाचा शेवट “री” नी होतो आणि माझ्या नावाची सुरूवात “रे” नी होते. बघा!जमलं तर फरक शोधा, खूप सापडतील.’ असं त्यांनी लिहिलं आहे.