पहिल्यांदाच येणार मेडिकल कॉमेडी सिरीज, रेणुका बजवणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 05:52 PM2020-02-19T17:52:48+5:302020-02-19T17:56:36+5:30
अभिनेत्री रेणुका शहाणे हिंदी आणि मराठी सिनेमासिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे
अभिनेत्री रेणुका शहाणे हिंदी आणि मराठी सिनेमासिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. पहिल्या 'वॉट द फोक्स' या वेबसिरीजनंतर मेडिकल कॉमेडीवर आधारित 'स्टार्टिंग ट्रबल' या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनव कमलने केलंय.
'स्टार्टिंग ट्रबल' ही वेबसिरीज आयुष्यात घडणाऱ्या घटनांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. डॉ.जगदीश चतुर्वेदी यांनी लिहिले 'इनव्हेंटिंग मेडिकल डिवायसेस' या पुस्तकावर आधारित आहे. डॉक्टरांच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या नव्या डॉक्टरांच्या आयुष्यावर हे पुस्तक आधारित आहे. 2016 ला या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेबसिरीजबद्दल बोलताना रेणुका म्हणाली, अभिनव आणि जगदीशसोबत सेटवर काम करणं माझ्यासाठी एक पिकनिकसारखे होते. डॉ. जगदीश यांच्यामुळे मला वैद्यकिय क्षेत्रातील अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. फक्त एकच गोष्ट कठीण होती ती म्हणजे जगदीश समोर मला माझा चेहरा सरळ ठेवायचा होता. या प्रोजेक्टचा एक भाग बनवण्यासाठी मी अभिनव आणि जगदीश यांची आभारी आहे.
या वेबसिरीजमध्ये डॉ. जगदीश चतुर्वेदी, रेणुका शहाणे, कुरुश देबू, अनुका यासारख्या कलाकारांची मुख्य भूमिका आहे.