"माँ तुझे सलाम"ला संपूर्ण महाराष्ट्रात 101 ठिकाणी भरभरुन प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 04:39 AM2018-01-09T04:39:17+5:302018-01-09T10:09:17+5:30
डॉ. तात्याराव लहाने यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई लहाने यांनी स्वत: अशिक्षीत असताना देखील डॉ. तात्याराव यांना स्वत: ची किडणी ...
ड . तात्याराव लहाने यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई लहाने यांनी स्वत: अशिक्षीत असताना देखील डॉ. तात्याराव यांना स्वत: ची किडणी दान करित दुसऱ्यांदा जन्म दिला. आईने दिलेल्या दुसऱ्या जन्माचे खऱ्या अर्थाने चीज करित डॉ. तात्याराव लहाने यांनी आपले नवजीवन गोरगरिंबांच्या सेवकरिता समर्पित केले.
मायलेकाच्या प्रेमातून निर्माण झालेल्या उदात्त भावनेला सलाम करण्याकरिता व त्यांचे प्रेरणादायी कार्य महाराष्ट्रातील कानकोपऱ्यात पोहचविण्याकरिता विराग मधुमलती वानखेडे या अष्टपैलू अभियंता दिग्दर्शकाने ''डॉ. तात्याराव लहाने अंगार द पवार ईज विदीन'' या चित्रपटाची निर्मिती स्वत:चे घर विकून केली.
या उदात्त भावनेच्या प्रसाराकरिता दिनांक 8/01/2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 101 ठिकाणी ''माँ तुझे सलाम'' या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम अहमदनगर येथे विश्वविख्यात समाजसेवक पद्ममभूषण अण्णा हजारे, दिग्दर्शक विराग मधुमालती वानखेडे, डॉ. गिरीष कुलकर्णी, वंदना वानखेडे, रिना अग्रवाल, डॉ. प्रकाश आणि सौ. सुधा कांकरिया आणि अनिल सानप यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. अन्नांनी या प्रेरणदायी चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांने आवर्जुन बघावा असे आवाहन केले.
या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत. डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. महत्वाचे म्हणजे चित्रपटाच्या उत्पन्नातून समाजसेवेचा वसा पुढे जावा या उदात्त हेतूने गोरगरीबांसाठी धर्मदाय डोळ्यांचे नेत्रालय उभारण्याचा डॉ. तात्याराव लहाने व विराग मधुमालती यांचा मानस आहे.