‘बारायण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद …

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 03:59 AM2018-01-16T03:59:39+5:302018-01-16T09:48:32+5:30

नव्या वर्षात नव्या कलाकारांसह, जुन्याच बारावीची पण नवीन गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट आलाय प्रेक्षकांच्या भेटीला. किशोरवयीन मुलांना तारुण्य जेव्हा ...

Response of audience to 'Barayana' movie ... | ‘बारायण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद …

‘बारायण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद …

googlenewsNext
्या वर्षात नव्या कलाकारांसह, जुन्याच बारावीची पण नवीन गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट आलाय प्रेक्षकांच्या भेटीला. किशोरवयीन मुलांना तारुण्य जेव्हा साद घालत, तेव्हाची मधल्या मध्ये तडमडत असलेली प्रश्नचिन्ह आणि त्यात अडकलेल्या मुलांची ही गोष्ट. कंटाळवाण्या होस्टेल लाईफ मध्ये सुद्धा मजा शोधून मस्ती करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या तावडीत सापडलेला अनिरुद्ध! अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन बाहेरचे जग दाखवून आयुष्य जगायला शिकवणारे सिनियर्स, कॅम्पस मध्ये भाई गिरी करणारा डी भाई आणि जमत नसेल तर आताच निघ म्हणून हाताला धरून बाहेर काढणारा भाई चा झालेला दादा, ओम भूतकर ने छानच साकारला आहे. मनातली वादळे मनातच लपवून अनुराग च्या चेहेर्यावरचा आज्ञाधारकपणा त्याचं निरागसत्व दाखवतो. कॉलेजातल्या यारी दोस्तीतली सफर या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. भाव खाऊन जाणारी कुशल बद्रिके यांची भूमिका विचार करायला लावणारी आहे. प्रार्थना बेहेरे, निपुण धर्माधिकारी काही खास पात्रांमधून धम्माल आणतात. 

नुसतेच शिक्षण पद्धतीवर टीका करणारे भरपूर असतात...पण समज म्हणून आपण देखील या पद्धतीचा कधी पालक म्हणून तर कधी विध्यार्थी म्हणून भाग आहोत हे विसरतो. बारावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे, या एका एका वर्षात जर चांगले मार्क्स नाही मिळाले तर आयुष्याचे काही खरे नाही? बारायण नेमक्या याच मुद्द्याला हाथ घालतो. परंतु अतिशय रंजक आणि मार्मिक कथानकातून. सिनेमातील अफलातून गाणी जणू मूड रिफ्रेश करून टाकतात.

मस्तीच्या वायरला दोस्तीचा चार्जर लाव हे गाण मरगळल्या मनाला चार्ज करते  तर अतिशय वेगळे असे बारावीचे अन्थेम सॉंग बारावी च्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आर्जव घालते. धमाल मनोरंजन आणि सशक्त कथानक आणि तितकीच उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेला 'बारायण' ला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिलेला आहे. 

Web Title: Response of audience to 'Barayana' movie ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.