बारावीच्या परीक्षेतही 'आर्ची' हिट ; अभिनेत्री रिंकू राजगुरूला मिळाले एवढे टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 01:19 PM2019-05-28T13:19:33+5:302019-05-28T13:26:26+5:30
सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात रिंकूने दहावीपेक्षा तब्बल १६ टक्के अधिक मिळवत तब्बल ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती.
पुणे :सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात रिंकूने दहावीपेक्षा तब्बल १६ टक्के अधिक मिळवत तब्बल ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती.
रिंकूने दहावीला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शाळेतून परीक्षा देत ६६.१० टक्के गन संपादित केले होते. मात्र बारावीला अधिक अभ्यास करून तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. तिने यंदा सोलापूर जवळील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा दिली. तिला बघण्यासाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यंदा तिचा कागर चित्रपट प्रदर्शित झाला असून आगामी चित्रपटाचे काम बेळगाव येथे सुरु असल्याचे समजते.
रिंकूचा निकाल खालीलप्रमाणे :
इंग्रजी | ५४ |
मराठी | ८६ |
इतिहास | ८६ |
भूगोल | ९८ |
राज्यशास्त्र | ८३ |
अर्थशास्त्र | ७७ |
पर्यावरण | ४९ |
एकूण : ५३३ /६५० | ८२ टक्के |