अमर फोटो स्टुडीओच्या टीमने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 01:24 PM2017-01-08T13:24:58+5:302017-01-08T13:24:58+5:30

सध्या मराठी नाटक एकापाठोपाठ येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या नाटकांकडे मालिका आणि चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले कलाकार रंगभूमीकडे ...

Reveal the ban by the immortal photo studio team | अमर फोटो स्टुडीओच्या टीमने केला खुलासा

अमर फोटो स्टुडीओच्या टीमने केला खुलासा

googlenewsNext
्या मराठी नाटक एकापाठोपाठ येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या नाटकांकडे मालिका आणि चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले कलाकार रंगभूमीकडे पाठ फिरवितात असे सारखेच कानावर पडत असते. मात्र नवीन कलाकारांवर ही जी टीका होता ती खोटी असल्याचा खुलासा नुकतेच अमर फोटो स्टुडिओच्या टीमने केला आहे. त्यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. या टीममधील कलाकार सांगतात की, चित्रपटांमुळे नावारूपाला आलेली मंडळी सहसा नाटकांकडे वळत नाहीत असा आरोप कलाकारांवर होत असतो. पण ही परिस्थिती बदलत आहे.  नाटकांचे प्रयोग, दौरे आणि इतर कामांमुळे कितीही दगदग झाली तरी नाटक करण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणातूनही आम्ही नाटकासाठी खास वेळ काढण्याला प्राधान्य देतो, असेही यावेळी या टीमने सांगितले. अमर फोटो स्टुडिओ हे नाटक सध्या खूपच चर्चेत आहेत. या नाटकामध्ये अमेय वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, सिद्धेश पुरकर, सखी गोखले या कलाकारांचा समावेश आहे. हे नाटकाची निर्मिती सुनिल बर्वे यांनी केली आहे. तर या नाटकाची लेखिका मनस्विनी आहे. या नाटकामध्ये तरूणांची लोकप्रि़य मालिका दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील कलाकार पाहायला मिळत आहे. या मालिकेतील अमेय वाघ हा अभिनेता सध्या या नाटकाबरोबरच मॅड या रियालिटी शोमध्येदेखील झळकणार आहे. तसेच तो महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणजेच तो रंगभूमीवर असलेल्या प्रेमापोटीच मालिका, चित्रपटाचेदेखील शेडयुल्ड सांभाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Reveal the ban by the immortal photo studio team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.