Revealed:ओळखा कोण आहे ही अभिनेत्री जी फिटनेसवर घेतेय इतकी मेहनत?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2017 07:27 AM2017-06-17T07:27:01+5:302017-06-17T13:02:29+5:30
'वाजले की बारा' फेम अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच आपल्या फिटनेस आणि आरोग्याबाबत सजग आणि तितकीच काळजी घेत असते. कायमच ...
' ;वाजले की बारा' फेम अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच आपल्या फिटनेस आणि आरोग्याबाबत सजग आणि तितकीच काळजी घेत असते. कायमच काही तरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करण्याच्या शोधात अमृता असते. आपलं सौंदर्य कायम राहवं आणि फिट दिसावं यासाठी अमृता याची कटाक्षाने काळजी घेत असते. मात्र काही दिवसांपूर्वीच अमृताने अशी एक गोष्ट केली की ज्यामुळे तिच्या जीवनात आमूलाग्र असा बदल झाला आहे. हे आम्ही नाही तर खुद्द अमृताने म्हटलं आहे. अमृतानं काही दिवसांपासून योगासनं आणि शिरशासनाचे धडे घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर तिनं याची माहिती दिली आहे.गेल्या काही काळापासून नेहमीचा व्यायाम किंवा वर्कआऊट करत होतो. मात्र त्यातून मानसिक समाधान मिळत नव्हतं. याच कारणामुळे काही तरी वेगळे करण्याच्या विचारात होते असं अमृताने ट्विटरवर नमूद केले आहे. तेव्हा एका मित्राने चैतन्य या योगगुरुची ओळख करुन दिल्याचे तिनं म्हटलं आहे.त्यांच्याकडे अमृताने योगासनंचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यांना भेटल्यानंतर आपल्याला वर्कआऊटपेक्षा मानसिक वर्कआऊटची गरज होती हे उमगल्याचे अमृताने म्हटले आहे. चैतन्यजींनी शिकवलेली योगासनं आणि त्यांचे प्रशिक्षण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत असल्याचे तिनं म्हटलं आहे. त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट खास असून नवचैतन्य निर्माण करत असल्याचे अमृताने ट्विटरवर सांगितले आहे. पहिल्याच भेटीत चैतन्यजींना शिरशासन शिकायचं आहे असं सांगितलं होतं. त्यावर ते हसले आणि म्हणाले की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्या प्रक्रियेतून जाणं गरजेचे आहे. ती प्रक्रियासुद्धा हवं ते मिळवण्या इतकीच आनंददायी असून तिथूनच नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या बोलण्याचा अर्थ आपल्याला योगासन शिकतानाच्या काळात उमगल्याचे अमृताने सांगितले.योगासन करत करत अखेर अमृता शिरशासनसुद्धा शिकली आहे.त्याचा फोटोसुद्धा तिनं ट्विटरवर शेअर केला आहे. अभिनेत्री आणि नच बलियेची विजेती असलेल्या अमृतानं काहीच अशक्य नसल्याचे दाखवून दिलं आहे. आता भविष्यात ती आणखी कोणती आव्हानात्मक गोष्ट करणार याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात.