खान्देशातील सखींना रिमा लागू यांनी दिली होती प्रेरणा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 11:47 AM2017-05-18T11:47:45+5:302017-05-18T18:21:43+5:30
-Ravindra More सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे १८ रोजी पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले हे वृत्त समजताच ...
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे १८ रोजी पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले हे वृत्त समजताच जळगावातील ‘लोकमत’ सखी मंचच्या सखींनी हळहळ व्यक्त केली.
१२ वर्षापूर्वी ‘लोकमत’ सखी मंचच्या कार्यक्रमात त्या जळगावात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी उपस्थित सखींना स्वत:च्या पायावर उभे राहाण्याचा कानमंत्र दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘ कोणत्याही महिलेने रडत बसू नये, परिस्थितीला आणि इतरांना दोष न देता किंवा कुणाकडून कोणतीही अपेक्षा न करता स्वत:च्या पंखाना स्वत:च बळ द्यायला हवे आणि खंबीरपणे उभे राहायला हवे.’
उपस्थित सखींनी रिमा लागू यांच्या भाषणाला मोठा प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आज अनेकजणी स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज त्यांच्या निधनाने अनेक सखींना त्यांनी दिलेला कानमंत्र आठवला आणि त्यांनी रिमा लागू यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली.
‘लोकमत’ सखी मंच कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळते, याबाबत रिमा लागू यांनी आनंद व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे रिमा लागू यांनी खान्देशातील प्रसिद्ध जेवणाचा ही आस्वाद घेतला होता. त्यांनी वांग्याचे भरीत, भाकरी, ठेचा आणि शेवभाजीचा यावर ताव मारला होता.
Also Read : ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन