कॅरी ऑन गर्ल रिना अगरवाल झाली शशांकची मीरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:57 PM2018-07-02T14:57:42+5:302018-07-02T15:02:35+5:30
प्लास्टिक पिशवी वर हटके पर्याय म्हणून एक मुलगी आपल्या रोजच्या वापराच्या वस्तुची कशा प्रकारे कॅरी बॅग बनवते आणि भाजी घेते हा व्हिडिओ परत एकदा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी प्लास्टिक बंदीवरुन बहुतांश लोकांना दंड ठोटावन्यात आला , तो पण 100 किंवा 500 रुपये नाही तर तब्बल 5 हजार. पर्यवरणाची होणाऱ्या हानीमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला, कही जणांनी याला संमती दिली तर बाकी लोकं "यावर उपाय काय?" अस म्हणत विचारात पडले आहेत.५ हजाराचा दंड वसूल करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडिया वर व्हायरल होत आहेत. त्या सोबतच अजुन एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.... तो व्हिडिओ म्हणजे "कॅरी ऑन! व्हिडिओ"
प्लास्टिक पिशवी वर हटके पर्याय म्हणून एक मुलगी आपल्या रोजच्या वापराच्या वस्तुची कशा प्रकारे कॅरी बॅग बनवते आणि भाजी घेते हा व्हिडिओ परत एकदा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील चेहरा 'रीना अगरवाल'चा आहे हे आपण सगळे जाणतोच, पण या व्हिडिओमुळे रीना अजूनच "फेमस"होत आहे.
बेहेन होगी तेरी, एजंट राघव , तलाश, अजिंठा सारख्या बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी रीना आता "३१दिवस" या आगामी मराठी चित्रपटातून २०जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या चित्रपटामध्ये रीनासोबत शशांक केतकर आणि मयुरी देशमुख हे देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. तर आता सर्व प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती ३१दिवस ची!
रिना नेहमीच समाजात घणा-या घटणांवर आपले परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. काही दिवसांपूर्वीच रिनाने आणखी एका मुद्दयावर आपले मत मांडले होते. मुलीने कोणते कपडे घालावे किंवा तिने काय करावे हा सर्वस्व तिचा हक्क आहे.तिला या बद्दल कोणीही काहीच बोलू शकत नाही. तिने तिच्या सोशल मीडियावर #IWillNotChangeTeriNazarBadal हा हॅशटॅग वापरून एक पोस्ट शेयर केली ज्यामध्ये तिने स्पष्ट केले आहे की "मी जशी आहे तशीच राहणार .... तू तुझी नजर बदल." या पोस्टचा एवढा परिणाम झाला की याच हॅशटॅगचा वापर करून इतर तरुणींनीसुद्धा रिनाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले होते.