आमिरच्या पाणी फाऊंडेशनच्या व्हिडीओमध्ये झळकणार रिंकू आणि आकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2017 01:37 PM2017-01-02T13:37:30+5:302017-01-02T13:37:30+5:30
मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षी जल युक्त शिवार योजनेला आमिर आणि किरण राव यांच्या पाणी फाऊंडेशनने दर्शवला आहे. पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राला ...
म ख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षी जल युक्त शिवार योजनेला आमिर आणि किरण राव यांच्या पाणी फाऊंडेशनने दर्शवला आहे. पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न आहे. आमिर खानने गेल्या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धे अंतर्गत दुष्काळग्रस्त गावांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी यात सहभाग घेतला होता. 116 गावांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी 367 लाख लीटर पाण्याचा साठा जमा करण्याची क्षमता निर्माण झाली. हेच लक्षात घेता पाणी फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत आणखी लोकांमध्ये यासंबंधी जन जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरणने एक यासंबंधी जनजागृती करणार एका व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला सैराटची टीम दिसणार आहे. या गाण्याला अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे तर गुरु ठाकूर यांनी याचे शब्द दिले आहेत. किरण रावने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सैराटनंतर रिंकू आणि आकाशची क्रेझ मेट्रो सिटी पुरती मर्यादित न राहता गावागावांमध्ये जाऊन पोहोचली आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेता आमिर आणि किरणने रिंकू आणि आकाशची निवड केली आहे. सैराटचा यशाचा फायदा नक्कीच पाणी फाऊंडेशनला होईल अशी आशा व्यक्त करण्याय हरकत नाही. अर्ची आणि परशासह या व्हिडीओत अनेक कलाकार झळकणार आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पहिल्या गावाला 50 लाखांचे. दुसऱ्या गावाला 30 लाखांचे आणि तिसऱ्या गावाला 20 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार आहेत. 8 एप्रिल ते 22 मे रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. याच प्रसंगी या म्युझिकल व्हिडीओचे लाँचिंग करण्यात येणार आहे.