Rinku Rajguru : रिंकू राजगुरूच्या भावाला पाहिलंत का? शेअर केला खास PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 03:44 PM2024-08-21T15:44:32+5:302024-08-21T15:45:10+5:30

बहीण जितकी ग्लॅमरस तितकाच साधा आहे भाऊ

Rinku Rajguru celebrated Raksha Bandhan 2024 brother siddharth rajguru Photos | Rinku Rajguru : रिंकू राजगुरूच्या भावाला पाहिलंत का? शेअर केला खास PHOTO

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूच्या भावाला पाहिलंत का? शेअर केला खास PHOTO

Rinku Rajguru celebrated Raksha Bandhan 2024  : अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट' (Sairat) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटाने तिने साकारलेली 'आर्ची' (अर्चना पाटील) ही भूमिका चांगलीच गाजली. तिच्या या भूमिकेचं आजही कौतुक होतं. रिंकू राजगुरू तिच्या कुटुंबाच्या फार जवळ आहे. ती कायम सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने राखीपौर्णिमेच्या (Raksha Bandhan 2024 ) खास मुहुर्तावर आपल्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे.

देशभरात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. सण म्हटला की प्रत्येकाच्या घरीच उत्साहाचे वातावरण असते. रिंकूनंही रक्षाबंधन तिच्या भावासोबत हा खास सण साजरा केला आहे. या खास सणाचे खास फोटोही रिंकूनं शेअर केलाय. या फोटोमध्ये रिंकू तिच्या  लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधताना दिसत आहे. सिद्धार्थ असं रिंकूच्या भावाचं नाव आहे. सिद्धार्थ (siddharth rajguru) प्रचंड साधा असून त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड आहे.


रिंकू ही अकलूज येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.  रिंकूचे आई-वडील उषा आणि महादेव दोघेही शिक्षक आहेत.  आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यांच्यामुळे रिंकूने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.  'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या. कागर, मेकअप आणि अनपॉज्ड सारख्या चित्रपटांत ती झळकली. मिळालेल्या संधीचं रिंकूने सोनं केलं. अल्पावधीतच तिला मराठीसह बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं.
 

Web Title: Rinku Rajguru celebrated Raksha Bandhan 2024 brother siddharth rajguru Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.