अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या साडीतल्या फोटोंनी चाहत्यांना लावलं याड, म्हणतायेत-अती सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 20:43 IST2022-02-23T16:52:47+5:302022-02-23T20:43:34+5:30
सैराट ( sairat) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली रिंकू रातोरात सुपरस्टार झाली

अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या साडीतल्या फोटोंनी चाहत्यांना लावलं याड, म्हणतायेत-अती सुंदर
रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. सैराट ( sairat) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली रिंकू रातोरात सुपरस्टार झाली. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे रिंकू संपूर्ण महाराष्ट्राची आर्ची झाली. त्यामुळे रिंकू चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. दरम्यान रिंकूने इन्स्टाग्रामवर काही साडीतले फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाच्या साडीत रिंकू खुपच सुंदर दिसतेय. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.अबब ब...ब लय भारी, खूप छान दिसत आहे तु, तुझे हे फोटो बघून स्मिता पाटीलची आठवण आली, अती सुंदर असे कमेंट याफोटोवर चाहते करतायेत.
रिंकू सैराटनंतर मेकअप, कागर या मराठी चित्रपटात तर १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आता ती छुमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती आकाश ठोसरसोबत झुंड या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे.