लवकरच येतोय ‘आर्ची’चा नवा सिनेमा, रिंकू राजगुरूने शेअर केले मुहूर्ताचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:19 PM2021-11-17T12:19:23+5:302021-11-17T12:28:57+5:30

Rinku Rajguru कोणती भूमिका साकारतेय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

rinku rajguru shares photo next project project no. 1 | लवकरच येतोय ‘आर्ची’चा नवा सिनेमा, रिंकू राजगुरूने शेअर केले मुहूर्ताचे फोटो

लवकरच येतोय ‘आर्ची’चा नवा सिनेमा, रिंकू राजगुरूने शेअर केले मुहूर्ताचे फोटो

googlenewsNext

‘सैराट’ फेम मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या करिअरची गाडी अगदी सूसाट धावतेय. लवकरच रिंकू एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. या आगामी चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या नव्या सिनेमाचं नाव काय तर ‘प्रोजेक्ट नंबर 1’.
सैराट, मेकअप आणि कागर नंतर रिंकू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच  ‘प्रोजेक्ट नंबर 1’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी रिंकू गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. रिंकूने हे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘प्रोजेक्ट नंबर 1’मध्ये रिंकू कोणती भूमिका साकारतेय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2016 साली ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू व परशा म्हणजेच आकाश ठोसर लोकप्रिय झाले. अभिनय क्षेत्रात काम करायचे ध्यानीमनी नसतानाही हे दोघे सिनेइंडस्ट्रीत आले.

या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. दोघांच्याही अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. त्यांना पाहण्यासाठी लोक आजही गर्दी करताना दिसतात.‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकू आणि आकाशने मागे वळून पाहिलेच नाही. रिंकू राजगुरूने ‘सैराट’नंतर काही मराठी सिनेमात काम केले. तसेच हिंदी वेबसीरिजमध्येही काम केले.
 लवकरच ती ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात तिच्यासोबत तिचा परशा म्हणजे अभिनेता आकाश ठोसर देखील दिसणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: rinku rajguru shares photo next project project no. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.