'आइये मेहरबान...!' रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओनं चाहत्यांना केलं मदहोश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 02:58 PM2021-05-19T14:58:08+5:302021-05-19T14:59:36+5:30

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आइये मेहरबान या गाण्यावर छत्री घेऊन थिरकताना दिसते आहे.

Rinku Rajguru's black and white video viral on social media | 'आइये मेहरबान...!' रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओनं चाहत्यांना केलं मदहोश

'आइये मेहरबान...!' रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओनं चाहत्यांना केलं मदहोश

googlenewsNext

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे.

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आइये मेहरबान या गाण्यावर छत्री घेऊन थिरकताना दिसते आहे. या व्हिडीओत रिंकू खूप छान दिसते आहे. यात तिने व्हाइट रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅण्ट घातली आहे. हा ब्लॅक अँड व्हाइट व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी तिचा अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.

या शिवाय रिंकू राजगुरूने काहीच दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Rinku Rajguru's black and white video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.