रिंकू राजगुरूचा हिंदी चित्रपट 'अनपॉज'चा ट्रेलर झाला रिलीज, यात आहेत ५ कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 09:12 PM2020-12-08T21:12:38+5:302020-12-08T21:13:31+5:30
रिंकू राजगुरू हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर आता अनपॉज या चित्रपटात दिसणार आहे.
'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. रिंकू राजगुरू हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील अनपॉज या चित्रपटात दिसणार आहे. पाच हिंदी लघुपट असलेला 'अनपॉज'चा ट्रेलर सादर केला. या लघुपटांमध्ये नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे.
राज अँड डीकेचे दिग्दर्शन असलेला आणि गुलशन दैवय्या व सय्यमी खैरचा अभिनीत ग्लिचमध्ये सध्याच्या काळात लोकांना इतरांच्या संपर्कात येण्याची भिती वाटत असताना एक हायपोकोन्ड्रिक पुरूष अनोळखी भेटीदरम्यान एका विलक्षण उत्साही मुलीला भेटतो. ही भेट त्याने अपेक्षा केलेल्या पेक्षाही अधिक अर्थपूर्ण ठरते.
निखिल आडवाणीचे दिग्दर्शन असलेला आणि रिचा चड्ढा, सुमीत व्यास व इश्वाक सिंग अभिनीत अपार्टमेण्ट. या लघुपटात एका यशस्वी ऑनलाइन वृत्तपत्राच्या मालकीणीला तिच्या पतीच्या लैंगिक स्वैराचाराबाबत समजते तेव्हा तिला धक्का बसतो आणि त्याबाबतीत काय करावे ते समजत नाही. निराश झालेली ती स्वत:लाच दोष देते आणि स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करते. त्रासदायक घुसखोराच्या वेषात आशेचा किरण एण्टर प्रवेश करतो. त्याचा प्रवेश खरेतर काही हेतूंसाठी असतो. त्याच्यासोबत संवाद साधल्यानंतर तिला तिच्या कटू स्थितीचा सामना करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आंतरिक शक्ती मिळते.
रिंकू राजगुरू, लिलेट दुबे अभिनीत आणि तनिष्ठा चॅटर्जी यांचे दिग्दर्शन असलेला रॅट-ए-टॅट. दोन महिला, चार दशकांपासून वेगवेगळ्या - एक महिला एकांतात राहण्याचे निवडते, तर दुसरी महिला स्थितींमुळे एकटी राहते, एकांताचा सामना करते आणि लॉकडाऊनदरम्यान त्यांच्यामध्ये असंभव मैत्री होते, ज्यामुळे त्यांना आशा मिळते आणि नवीन शुभारंभाची सुरूवात होते.
अविनाश अरूण यांचे दिग्दर्शन असलेला आणि अभिषेक बॅनर्जी व गितिका वैद्य ओहळ्यान अभिनीत विषाणू. लॉकडाऊनदरम्यान एक तरूण स्थलांतरित कुटुंब घरभाडे न भरण्यासाठी त्यांच्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात आल्यानंतर ते बांधकाम कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या इमारतीमधील आलिशान सॅम्पल फ्लॅटमध्ये बेकायदेशीर राहण्याचे ठरवतात. यावेळी ते काही काळापुरते त्याच्या गडद वास्तविकतेशी सामना करण्याच्या संघर्षाला बाजूला सारत स्वप्नवत जीवन जगतात.
नित्या मेहरा यांचे दिग्दर्शन असलेला आणि रत्ना पाठक शाह व शार्दुल भारद्वाज अभिनीत चांद मुबारक. या लघुपटात एका श्रीमंत मध्यमवर्गीय अविवाहित महिलेला मुंबईच्या लॉकडाऊनदरम्यान काही कामे करण्यासाठी तरूण रिक्षाचालकाची मदत घ्यावी लागते. महिला हट्टी व जातीबाबत सचेत असते आणि तिला ड्रायव्हरचे महिलांबाबत असलेल्या रूढीवादी मतांचा राग येतो. विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या या दोन्ही अनोळखी व्यक्ती तीन दिवस एकत्र व्यतित करतात. हळूहळू दोघेही एकमेकांना त्यांच्या जीवनातील गोष्टी सांगू लागतात आणि त्यांच्यामध्ये आदर व सामंजस्यावर आधारित असंभव मैत्री होते. त्यांना समजते की, ते दोघेही सर्वांपेक्षा वेगळे आहेत आणि स्वप्ननगरीमध्ये एकटे आहेत.
अनपॉज हा चित्रपट १८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.