Riteish Deshmukh : झोपेतून उठताच रितेशला बायकोला दिलं खास बर्थ डे गिफ्ट, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 01:51 PM2022-12-18T13:51:02+5:302022-12-18T13:52:38+5:30
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने कालच आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त रितेशवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण वाढदिवशी बायकोनं दिलेलं सरप्राइज पाहून रितेश भाऊ भारावून गेला.
अभिनेता रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) याने कालच (17 डिसेंबर)आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त रितेशवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण वाढदिवशी बायकोनं दिलेलं सरप्राइज पाहून रितेश भाऊ भारावून गेला. होय, जिनिलीयाने (Genelia D'Souza ) रितेशला वाढदिवशी एक मस्त सरप्राइज दिलं.
लवकरच रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. रितेश व जिनिलीया या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय हा सिनेमा रितेश दिग्दर्शित करतोय. ‘वेड’ सिनेमा आणि नवरोबाचा बर्थ डे म्हटल्यावर जिनिलीयाने रितेशच्या वाढदिवशी एक खास सरप्राईज प्लान केलं. रितेशने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
वाढदिवशी रितेशनं आई, बायको आणि दोन्ही मुलांसोबत खास सुरूवात केली. रितेश झोपेत असतानाच त्याची दोन्ही मुलं त्याला उठवायला गेली. झोपेतून उठताच रितेशनं सर्वप्रथम मुलांना पाहिलं. रुममधून बाहेर येताच त्याला समोर आई दिसली. तो आईच्या पाया पडला आणि आईला घट्ट मिठी मारून आशीर्वाद त्याने तिचे घेतले. जिनिलीयाने हॅप्पी बर्थ डे मिस्टर डिरेक्टर असं लिहिलेलं सुंदर डेकोरेशन केलं होतं. ते पाहून रितेश आश्चर्यचकित झाला. दोन्ही मुलांनी रितेशसाठी गायलेलं आय लव्ह यू बाबा... आई, बायकोने केलेलं औक्षण, हॅप्पी बर्थ डे बाबा.. हे सुंदर गाणं, जिनिलीयाचं सरप्राईज हे सगळं एकदम लईभारी होतं.
हा व्हिडीओ शेअर करत रितेशने जिनिलियाचे आभार मानले आहेत. आजचा माझा दिवस खास बनवण्यासाठी तुझे किती आभार मानू. मी खरंच नशीबवाण आहे की, तुझ्यासारखी मैत्रिण, जोडीदार मला मिळाली. तू माझं फॉरेव्हर वाला लव्ह आहेस, माझं वेडवाला लव्ह आहेस, अशी पोस्ट रितेशने शेअर केली आहे.