Ved Marathi Movie : भाऊ-वहिनीच्या 'वेड'चं बजेट किती? कमावले किती? १३ व्या दिवशी इतकी केली कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:46 PM2023-01-12T16:46:31+5:302023-01-12T16:47:56+5:30
Ved Marathi Movie Box Office Collection day 13: रितेश व जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमानं सर्वांना वेड लावलं. अद्यापही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही...
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) हा सिनेमा प्रदर्शित झाला अन् या सिनेमानं सगळ्यांनाच वेड लावलं. सिनेमाच्या कमाईनंही सर्वांनाच थक्क केलं. १३ दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
रितेश व जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमानं सर्वांना वेड लावलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. गेल्या १३ दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या दुप्पट गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटाचा बजेट किती असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर हा चित्रपट बनवण्यासाठीही कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात आला.
'वेड'वर खर्च झालेत इतके कोटी
रितेशने या चित्रपटावर सुमारे १६ कोटी खर्च केलेत. रितेशने मधल्या काळात दोन तीन सिनेमे केलेत आणि यातून मिळालेला सर्व पैसा 'वेड'वर खर्च केला. खुद्द रितेशने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. पण आनंदाची बाब म्हणजे, हा सगळा पैसा आता वसूल झाला आहे.
१३ दिवसांत चित्रपटाने दुप्पट कमाई केली आहे.
१३ व्या दिवशी कमावले इतके कोटी
'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींची कमाई केली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'वेड' या सिनेमाने २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली. काल बुधवारी १३ व्या दिवशी या चित्रपटाने १.१० कोटी कमावले. एकूण कमाईबद्दल विचाराल तर आत्तापर्यंत 'वेड' या सिनेमाने ३७.७७ कोटींचा गल्ला जमवला आहे. अद्यापही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही.
'वेड' या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
'वेड' या सिनेमाद्वारे जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तर रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.