'वेड' लावलं! इतके पुरस्कार की हातातच मावेनात, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' मध्ये रितेश-जिनिलीयाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:44 PM2024-01-19T12:44:13+5:302024-01-19T12:45:05+5:30

दादा-वहिनींनी बाजी मारली! 'वेड'च महाराष्ट्राचा फेव्हरेट, रितेश-जिनिलीयाच्या सिनेमाला मिळाले 'इतके' पुरस्कार

riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie got 9 awards in maharashtracha favaourite kon | 'वेड' लावलं! इतके पुरस्कार की हातातच मावेनात, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' मध्ये रितेश-जिनिलीयाची बाजी

'वेड' लावलं! इतके पुरस्कार की हातातच मावेनात, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' मध्ये रितेश-जिनिलीयाची बाजी

महराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा गाजलेला पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आणि संबंधित विभागांमधील अनेकांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनींनी बाजी मारली आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांवर भारी पडले आहेत. त्यांच्या 'वेड' चित्रपटाला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?मध्ये तब्बल ९ पुरस्कार मिळाले आहे. रितेशने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

रितेश-जिनिलीयाच्या 'वेड'ने महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा ठरण्याबरोबरच 'वेड'ने अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. रितेशने जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघांच्याही हातात पुरस्कार दिसत आहे. 

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात वेडला मिळालेले पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रितेश देशमुख
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जिनिलीया देशमुख
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रितेश देशमुख
सर्वोत्कृष्ट गाणं : सुख कळले
सर्वोत्कृष्ट गायक : अजय-अतुल (वेड तुझा)
सर्वोत्कृष्ट गायिका : श्रेया घोषाल (सुख कळले)
पॉप्युलर फेस ऑफ द इयर : जिनिलीया देशमुख 
स्टाइल आयकॉन ऑफ द इयर : रितेश देशमुख 

रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत झी टॉकीज आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ३० डिसेंबर २०२२ रोजी 'वेड' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून रितेश दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. तर जिनिलीयाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. रितेश-जिनिलीया मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने महाराष्ट्राला अक्षरश: 'वेड' लावलं होतं. 

Web Title: riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie got 9 awards in maharashtracha favaourite kon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.