रितेश देशमुखनं 'चंद्रमुखी'चं केलं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 04:18 PM2022-04-23T16:18:19+5:302022-04-23T16:19:29+5:30
Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखने 'चंद्रमुखी' (Chandramukhi Movie) चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)चा आगामी चित्रपट चंद्रमुखी(Chandramukhi)ची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असलेल्या चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, नुकतेच अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)ने ‘चंद्रमुखी’साठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चंद्रमुखी चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर करून चित्रपटासह संपूर्ण टीमची प्रशंसा केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले की, विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित एक भव्य मराठी संगीतावर चंद्रमुखी या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. अजय अतुल यांची जोडी, प्रसाद ओक, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांसारखे उत्कृष्ट कलाकारांनी साकारलेली ‘चंद्रमुखी’ तुमचे मन जिंकण्यासाठी येत आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
Grand Marathi Musical based on an acclaimed book written by Vishwas Patil -music by the maestros @AjayAtulOnline & helmed by stupendously talented team @prasadoak17@AmrutaOfficialK@adinathkothare@EverestMarathi ‘Chandramukhi’ is here to win your hearts https://t.co/tu3I85Z81r
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 22, 2022
रितेश देशमुखच्या या पोस्टवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. तिने म्हटले की, लय भारी सुपरस्टारची ही एक सुंदर प्रतिक्रिया आहे…मनापासून धन्यवाद.
या चित्रपटात अमृता खानविलकरने चंद्राची, तर आदिनाथ कोठारेने दौलत रावांची भूमिका साकारली आहे. तर दौलत रावांच्या पत्नीची भूमिका मृण्मयी देशपांडेने निभावली आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.