Ved box office Collection Day 16 : ‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 02:12 PM2023-01-15T14:12:59+5:302023-01-15T14:14:08+5:30

Ved box office Collection Day 16 : ३० डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि  पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.आता तर...

Riteish Deshmukh-starrer becomes second-highest grossing Marathi film after Sairat | Ved box office Collection Day 16 : ‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!!

Ved box office Collection Day 16 : ‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!!

googlenewsNext

Ved box office Collection Day 16 : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या  ‘वेड’ (Ved) या सिनेमानं  प्रेक्षकांना जणू वेड लावलं आहे. अगदी सुरुवातीपासूनच ‘वेड’ चर्चेत आला. चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं, तसं चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. पाठोपाठ ‘वेड’ची तीन गाणी रिलीज झाली आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. ३० डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि  पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.आता तर हा सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे.

विक्रमावर विक्रम...
 एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने कधीच मोडीत काढला. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 'वेड'ने ५.७० कोटींची कमाई केली. व्यावसायिकदृष्ट्या सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘सैराट’नं कोणत्याही दिवशी एवढी कमाई केली नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार ‘सैराट’ची सर्वाधिक कमाई ४.६१ कोटींची होती. मात्र ‘सैराट’चा हा रेकॉर्ड 'वेड'ने मोडला.  ‘लय भारी’ हा रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होता. पण ‘वेड’ने त्यालाही मागे टाकलं.  आता ‘वेड’ आणखी एका विक्रमावर नाव कोरलं आहे. चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. पहिलं स्थान अर्थातच ‘सैराट’कडे आहे.

१६ व्या दिवशी इतकी केली कमाई
 ट्रेड ॲनानिस्ट तरण आदर्श यांनी ‘वेड’च्या कमाईचे ताजे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार शुक्रवारी या सिनमाने १.३५ कोटींची कमाई केली. तर काल शनिवारी रिलीजच्या १६ व्या दिवशी २.७२ कोटींचा गल्ला जमवला. आज रविवारी ‘वेड’ आणखीन जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता लवकरच हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे.‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. 

Web Title: Riteish Deshmukh-starrer becomes second-highest grossing Marathi film after Sairat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.