Prajakta Deshmukh : ‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:17 PM2023-02-03T17:17:53+5:302023-02-03T17:19:10+5:30
Prajakta Deshmukh Car Accident : “नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का?”, प्राजक्त देशमुखचा संतप्त सवाल
Prajakta Deshmukh Car Accident : रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांच्या तुफान गाजलेल्या ‘वेड’ या सिनेमाचा संवाद लेखक प्राजक्त देशमुख आज एका अपघातातून थोडक्यात बचावला. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये तो किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने सोशल मीडियावर आपला संताप बोलून दाखवला. हायवेला कुणी वाली आहे का, असा संतप्त सवाल त्याने केला. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेला हा अपघात एका अवजड वाहनाच्या बेजबाबदार कृतीमुळे झाल्याचे प्राजक्तनं म्हटले आहे.
नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?१/ज्ञ pic.twitter.com/uaJSasmXey
— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) February 3, 2023
“नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम..?” असे त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
https://t.co/D7pcNwrN8r
— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) February 3, 2023
ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा. ज्ञ/ज्ञ
“ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता. अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा,” असंही पुढे त्याने लिहिलं आहे.
प्राजक्त देशमुख गाजलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा नाटककार आहे. त्याच्या या नाटकावर कित्येक पुरस्काराचा वर्षाव झाला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 2017 मध्ये आलेल्या ‘देवबाभळी’ या नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.