जिनिलिया वहिनींचा आज वाढदिवस, रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:48 PM2024-08-05T12:48:39+5:302024-08-05T12:49:07+5:30

रितेशला सगळे भाऊ तर जिनिलियाला प्रेमाने वहिनी म्हणतात. त्यांचे कॉमेडी रील्स नेहमीच व्हायरल होतात.

Riteish Deshmukh wishes wife Genelia Happy Birthday shared comedy reel | जिनिलिया वहिनींचा आज वाढदिवस, रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

जिनिलिया वहिनींचा आज वाढदिवस, रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या जनतेचं लाडकं कपल रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख (Riteish Deshmukh-Genelia Deshmukh). त्यांच्या जोडीने चाहत्यांना वेड लावलं आहे. रितेशला सगळे भाऊ तर जिनिलियाला प्रेमाने वहिनी म्हणतात. त्यांचे कॉमेडी रील्स नेहमीच व्हायरल होतात. आज जिनिलिया वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने रितेश भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यातला फरक त्याने मजेशीर रीलमधून दाखवलं आहे. 

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. त्याआधी दोघंही ८ वर्ष एकमेकांना डेट करत होते. जिनिलिया रितेशपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. आज जिनिलिया 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने रितेशने मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोमँटिक गाण्यावर त्याने जिनिलियासोबतचा व्हिडिओ घेतला आहे जो लग्नाआधीचा आहे. पुढे लग्नाचा फोटो आणि लग्नानंतर त्याच्यावर बायकोची सेवा करण्याची वेळ आल्याचं त्याने मजेशीररित्या दाखवलं आहे. या व्हिडिओला कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'हॅपी बर्थडे बायको, तू खरोखरंच माझं आयुष्य बदललं आहेस.'


रितेश जिनिलियाने 2003 साली पहिल्यांदा 'तुझे मेरी कसम' या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. रितेश त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने त्याला अॅटिट्यूड असेल असं सुरुवातीला जिनिलियाला वाटलं होतं. म्हणून तिनेच आधी त्याला अॅटिट्यूड दाखवला. मात्र नंतर दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडला आणि ते प्रेमात पडले. बरीच वर्ष डेट केल्यानंतर 2012 साली े लग्नबंधनात अडकले. आज त्यांना दोन मुलं आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या त्यांच्या 'वेड' सिनेमाने मराठी सिनेसृष्टी दणाणून सोडली. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन ही जोडी कायमच कमाल करत आली आहे. 

Web Title: Riteish Deshmukh wishes wife Genelia Happy Birthday shared comedy reel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.