"मुलं प्रयत्न करत आहेत..." रिहान आणि राहीलचं फुटबॉल प्रेम पाहून भारावली जिनिलिया, video पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:48 IST2024-07-27T14:44:59+5:302024-07-27T14:48:30+5:30
मराठी कलाविश्वात रितेश-जिनिलिया सोबतच त्यांच्या मुलांच्या संस्कारांचं कायम कौतुक होत असतं.

"मुलं प्रयत्न करत आहेत..." रिहान आणि राहीलचं फुटबॉल प्रेम पाहून भारावली जिनिलिया, video पाहा
Ritesh Deshmukh And Genelia Deshmukh Children Video : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही जोडी कायमच चर्चेत असते. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत. त्यांच्याकडे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या बॉंडिंगचे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. मराठी कलाविश्वात रितेश-जिनिलिया सोबतच त्यांच्या मुलांच्या संस्कारांचं कायम कौतुक होत असतं.
अलिकडेच रितेश-जिनिलियाच्या मुलांच्या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली. रिहान आणि राहील अशी त्यांच्या दोन गोंडस मुलांची नावे आहेत. दरम्यान, हे कपल सोशल मीडियावर आपल्या मुलांचे किंवा त्यांच्यासोबत मज्जा-मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या अभिनेत्रीने त्यांच्या मुलांचा असाच एक शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.
नुकताच अभिनेत्री जिनिलिया देशमुखने रिहान आणि राहीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये भल्या पहाटे ते दोघे भाऊ फुटबॉल खेळण्यासाठी मैदानावर हजर झाले आहेत. या व्हिडीओतून रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांची खेळाप्रती प्रचंड आवड असल्याचं समजतंय. जिनिलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या मुलांचं सकाळी झोपेतून उठल्यानंतरच शेड्यूल सांगितलं आहे.
"पावसामध्ये सकाळी ६ वाजता उठायचं त्यानंतर ७ वाजता फुटबॉल प्रॅक्टिस असं यांच वेळापत्रक आहे. या मुलांना फुटबॉल खेळण्यापासून कोणीच रोखु शकत नाही. शिवाय मुलं प्रयत्न करतायत हे महत्वाचं आहे". असं लक्षवेधी कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.