रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख झळकणार पुन्हा एकदा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 20:30 IST2018-12-03T20:30:00+5:302018-12-03T20:30:00+5:30
तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या 'माऊली' या आगामी चित्रपटातील नवे गाणे लवकरच प्रदर्शित झाले आहे .

रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख झळकणार पुन्हा एकदा एकत्र
तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या 'माऊली' या आगामी चित्रपटातील धुवून टाक असे बोल असणारे नवे गाणे लवकरच प्रदर्शित झाले आहे . या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याला 'माझी पंढरीची माय' ला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमारच्या हस्ते कार्तिकी एकादशीला लॉन्च झालेल्या या गाण्याने आजवर तब्बल आठ ते दहा मिलीयन व्ह्यूज मिळवले. भक्तिरसात नाहिल्यानंतर आता महाराष्ट्र रंगणार आहे तो होळीच्या रंगात!
'लय भारी'मधील आला होळीचा सण 'लय भारी' हे गाणे सुद्धा प्रचंड गाजले होते, मात्र यंदा येणार होळीचे गाणे, हे आणखीन रंगीत, आणखीन धमाकेदार आणि ऐकता क्षणी नाचायला लावणारे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या गाण्यात महाराष्ट्राला हवहवसे असणारे एक मोठे सरप्राईज दडले आहे. ते म्हणजे या गाण्यातून पुन्हा एकदा रितेश व जेनेलिया झळकणार आहेत.
रितेश म्हणाला की, 'जिनेलिया सोबत काम करण्याची कोणतीही संधी मी सोडू शकत नाही, खरतर हे गाणे करण्याचा आग्रह मी त्यांना केला होता. त्यांच्या सोबत ४ वर्षानंतर गाणे करण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि ते ही अजय अतुलच्या धमाकेदार चालीवर, आपेक्षा बाळगतो की तुम्हाला ही हे गाणे पाहायला तितकीच मजा येईल जितकी आम्हाला हे गाणे करताना आली.'
'झिंगाट', 'डॉल्बीवाल्या', 'ब्रिंग इट ऑन' या गाण्यानंतर अजय अतुल पुन्हा एकदा हे धमाकेदार गाणे घेऊन आले आहेत. या गाण्याचे भन्नाट शब्द अजय गोगावले यांनी लिहिले असून तब्बल दीडशे ते दोनशे डान्सर्स सोबत हे गाणे हिंदीतल्या आघाडीचे कोरिओग्राफर बॉस्को सिजर यांनी कोरियोग्राफ केले आहे. जिओ स्टुडिओज हिंदुस्तान टॉकीज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित माऊली येत्या १४ डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र या गाण्याने डिसेंबरमध्येच सगळयांना रंग खेळण्याची इच्छा होणार हे मात्र नक्की.