गोलिगत धोका अन् बटनाने टेंगुळ...! रितेश देशमुखची धाकट्या भावाच्या प्रचारात तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:21 PM2024-11-11T13:21:59+5:302024-11-11T13:24:01+5:30

रितेश देशमुख दोन्ही भावांसाठी प्रचारात उतरला आहे.

Ritiesh Deshmukh s speech for brother Dhiraj deshmukh for Maharashtra assembly election | गोलिगत धोका अन् बटनाने टेंगुळ...! रितेश देशमुखची धाकट्या भावाच्या प्रचारात तुफान फटकेबाजी

गोलिगत धोका अन् बटनाने टेंगुळ...! रितेश देशमुखची धाकट्या भावाच्या प्रचारात तुफान फटकेबाजी

सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल आहे. सर्व उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखही (Riteish Deshmukh) राजकीय कुटुंबातून आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा तो मुलगा आहे. रितेश राजकारणात नसला तरी त्याचे दोन्ही भाऊ अमित आणि धीरज हे राजकारणात सक्रीय आहेत. दोघंही लातूरच्या दोन सीटवर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. अमित देशमुख हे लातूर शहरातून निवडणूकीच्या रिंगणात आहेत तर धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) लातूर ग्रामीण मधून मैदानात आहेत. नुकतंच लातूर मध्ये झालेल्या सभेत धाकटा भाऊ धीरजसाठी स्वत: रितेश देशमुखने दमदार भाषण केले.

रितेश देशमुख दोन्ही भावांसाठी प्रचारात उतरला आहे. यावेळी त्याने बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली. तो म्हणाला, "समोर गुलीगत धोका आहे. सावधान राहा. या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. बुक्कीत नाही आता बटनाने टेंगुळ द्यायची बारी आलेली आहे. ईव्हीएमवर २०-२५ नावं आहेत पण विकासाचं, कामाचं एकच नाव आहे. एक नंबर...धीरज विलासराव देशमुख. सातत्याने तुमच्यासाठी झटत आहेत, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करत आहे आणि भाषण काय करतात राव. अमित भैय्या इकडे एक नंबर, धीरज तिकडे एक नंबर...आम्ही जिथे आहोत तिथे बरे आहोत."


अमित देशमुख हे चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. आतापर्यंत तीनही निवडणूकांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तर धीरज देशमुख दुसऱ्यांदा निवडणूकीत उतरले आहेत. याआधी २०१९ साली त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला होता. 

 

Web Title: Ritiesh Deshmukh s speech for brother Dhiraj deshmukh for Maharashtra assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.