थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रितेश-जिनिलियाचा 'वेड' OTTवर रिलीजसाठी सज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:02 PM2023-04-13T18:02:28+5:302023-04-13T18:05:15+5:30

Ved Marathi Movie : ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'वेड' चित्रपट ओटीटीवर केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे.

Ritiesh-Genelia Starrer 'Ved' All Set For OTT Release After Blowing Up Theatres, Know All Details | थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रितेश-जिनिलियाचा 'वेड' OTTवर रिलीजसाठी सज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रितेश-जिनिलियाचा 'वेड' OTTवर रिलीजसाठी सज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

googlenewsNext

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख(Genelia Deshmukh)च्या 'वेड' (Ved Marathi Movie) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. या चित्रपटातील गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आणि पाठोपाठ चित्रपटही डोक्यावर घेतला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नुसता धुमाकूळ घातला. त्यानंतर आता वेड चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल पासून डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. 

'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. ५० दिवसांत 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला होता तर देशात ६०. ६७ कोटींचा बिझनेस केला होता. आता १०० दिवसांत या चित्रपटाने एकूण किती कमाई केली तर १०० दिवसांत 'वेड'ने एकूण ७५ कोटींची कमाई केली आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरला आहे.


थिएटरनंतर आता प्रेक्षकांना पुन्हा रितेश-जिनिलियाची केमिस्ट्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायल मिळणार आहे. 'वेड' चित्रपट येत्या २८ एप्रिल पासून डिस्नी प्लस हॉटस्टारवर दाखल होणार आहे. यासाठी त्यांच्याकडं डिस्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन असणं गरजेचं आहे.

Web Title: Ritiesh-Genelia Starrer 'Ved' All Set For OTT Release After Blowing Up Theatres, Know All Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.