रियाला का करायचे मराठी चित्रपटात काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 02:39 PM2016-11-15T14:39:33+5:302016-11-15T14:39:33+5:30

        बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन सध्या फारशी कुठे दिसतच नाही. हिंदी चित्रपटातीत तिच्या काही  ठराविक भूमिका ...

Riya to work in Marathi film? | रियाला का करायचे मराठी चित्रपटात काम?

रियाला का करायचे मराठी चित्रपटात काम?

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">        बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन सध्या फारशी कुठे दिसतच नाही. हिंदी चित्रपटातीत तिच्या काही  ठराविक भूमिका सोडल्या तर रिया फारशी लक्षात राहणारी नाही. मल्टीस्टारर चित्रपट किंवा अगदीच नवोदित कलाकारांसोबत ती आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसली. आता रियाला मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे म्हणे. अहो असे आम्ही सांगत नाही. तर स्वत: रियाने या बातमीला दुजोरा दिला आहे. एका कार्यक्रमादरम्यान रियाने मराठी चित्रपटांबद्दल अनेक गोष्टी बोलल्याचे समजतेय. रियाला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहे. तर मराठी चित्रपटांच्या कथा उत्तम असल्याचेही तिने सांगितले आहे. आज मराठी सिनेमा साता समुद्रापार पोहोचला आहे. आपल्या मराठी चित्रपटांचा आशय देखील दर्जेदार असतो. एवढेच नाही तर मराठी चित्रपटांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर देखील आपली मोहोर उमटविली आहे. परदेशांमधील थिएटर्समध्ये आज मराठी चित्रपटांचे शोज लागत आहेत. असे असताना सर्वच चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आपणही मराठी चित्रपटाचा भाग होऊयात असे वाटू लागले आहे. साऊथमधील अनेक कलाकार देखील आज मराठीमध्ये आपले नशीब आजमावू पाहत आहेत. तर प्रियांका चोप्रासारख्या बॉलिवूड अभिनत्रीलाही मराठी चित्रपट बनविण्याची भूरळ पडल्यचे आपण पाहिले आहे. बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची का होईना पण भूमिका साकारली असल्याचे आपण पाहिलेय. परंतु आता हेच कलाकार  मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करायची असल्याचे जगजाहीर बोलत असताना पाहायला मिळतेय. आता रियाचेच पाहा ना, ती  नक्कीच काही दिवसात आपल्याला मराठी चित्रपटात दिसू शकतेय असे वाटतेय. आता रियाची मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा पुर्ण होतेय का? हे तर आपल्याला समजेलच.

Web Title: Riya to work in Marathi film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.