करण जोहरच्या 'RARKPK'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी क्षिती आहे या प्रसिद्ध मराठमोळ्या कपलची लेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 07:27 PM2023-08-07T19:27:05+5:302023-08-07T19:30:01+5:30
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये क्षिती जोगने जय बच्चन यांच्या सूनची भूमिका साकारली आहे.
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतो आहे. यातील आलिया भट आणि रणवीर सिंगच्या भूमिकेचे कौतुक होतोय. या सिनेमात रणवीर सिंगच्या आईची भूमिका मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगने साकारली आहे. क्षिती जोगच्या भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक केलंय. याआधी देखील क्षितीने हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का क्षिती एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीची लेक आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंत.
मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. क्षिती प्रसिद्ध खालनायक अनंत जोग यांची मुलगी आहे. अनंत जोग यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही आपल्या भूमिकांनी छाप पाडली आहे. 'रावडी राठोड','नो एन्ट्री', 'शांघाय', 'दहेक', 'कच्ची सडक','सरकार', 'लाल सलाम', 'रिस्क', 'सिंघम' यांसारख्या सुपहिट सिनेमातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे. क्षितीची आई उज्वला जोग याही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्या स्वप्निल जोशीच्या ‘तू तेव्हा तशी' मालिकेत दिसल्या होत्या.
क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. 'घर की लक्ष्मी बेटिया','साराभाई vs साराभाई', 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही क्षिती झळकली होती.
क्षितीने अभिनेता हेमंत ढोमेसह लग्न करत संसार थाटला आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.