रोहित-जुईलीचे नवे कव्हर साँग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:14 PM2018-08-01T16:14:28+5:302018-08-01T16:28:36+5:30
‘तेरा यार हूँ मै- तेरी यारियाँ’ रोहित-जुईलीचे फ्रेंडशीप कव्हर साँग प्रदर्शित करण्यात आले आहे.
मराठीतला रॉकस्टार रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकर यांनी एकत्र येऊन गेल्या महिन्यात ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’ हे पहिले मॅशअप गाणे सादर केले होते. या गाण्याला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता रोहित-जुईलीचे नवे कव्हर साँग भेटीला आले आहे. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचे फ्रेंडशीप कव्हर साँग प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘तेरा यार हूँ मै- तेरी यारियाँ’ ह्या दोघांचे मॅशअप जेवढे सुमधूर आहे, तेवढाच गाण्याचा व्हिडिओसुद्धा चांगला चित्रीत करण्यात आला आहे.
या गाण्याविषयी रोहित राऊतने सांगितले, “लोकांच्या आग्रहास्तव आम्ही पहिले मॅशअप केले होते. ते आमच्या चाहत्यांना एवढे आवडले, की त्यांनी अजून एक गाणे गाण्याचा आग्रह धरला. म्हणून आता हे दूसरे कव्हर साँग घेऊन आलो आहे आणि आमच्या चाहत्यांना वचन दिल्याप्रमाणे, अजून काही कव्हर साँग घेऊन येण्याचा आमचा मानस आहे. हे मॅशअप गाणे प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे”
गायिका जुईली जोगळेकर म्हणाली, “माझ्यासाठी आणि रोहितसाठी यंदाचा फ्रेंडशीप डे खूप खास आहे. कारण आमच्या मैत्रीला यंदा एक दशक पूर्ण होत आहे. त्यामूळे दूसरे कव्हर साँग करताना मैत्रीविषयीचीच दोन गाणी आम्ही निवडली. हे गाणेदेखील नक्कीच प्रेक्षकांना भावेल. ”
‘तेरा-यार हूँ मै- तेरी यारियाँ’ हे गाणे फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने सादर करून रोहित व जुईलीने तरूणांचे मन जिंकले आहे आणि त्यांचे चाहते त्यांच्या पुढील मॅशअप साँगची आतुरतेने वाट पाहत आहेत.