रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर साखरपुड्यात झाले इमोशनल, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:24 PM2022-01-22T13:24:27+5:302022-01-22T13:24:47+5:30

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

Rohit Raut and Juilee Joglekar get emotional in sugarplum, video goes viral | रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर साखरपुड्यात झाले इमोशनल, व्हिडीओ झाला व्हायरल

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर साखरपुड्यात झाले इमोशनल, व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत  (Rohit Raut)आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, या साखरपुड्याच्या फोटोंसोबत त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत रोहित आणि जुईली इमोशनल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घातल्यानंतर त्या दोघांनी मिठी मारली. त्यावेळी ते दोघे खूप इमोशनल झालेले दिसले. त्या दोघांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.


२००९ साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन भेटीला आला होता. रोहित राऊत या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हा रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

Web Title: Rohit Raut and Juilee Joglekar get emotional in sugarplum, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.