रोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 12:21 PM2018-04-25T12:21:59+5:302018-04-25T17:51:59+5:30

सध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणा-या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला ...

Rohit Raut started Marma Music Academy | रोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी

रोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी

googlenewsNext
्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणा-या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक अकादमी सुरू केली आहे.आपल्या अकदमीविषयी माहिती देताना रोहित म्हणतो, “लातूरला संगीताचं ज्ञान असलेल्या चांगल्या गुरूंची किंवा टॅलेंटची कमतरता नाही आहे. पण तरूण प्रतिभेला गायन क्षेत्रात करीयर करताना कॉन्फिडन्स देण्याची आणि त्यांच्या प्रतिभेला पैलु पाडण्याची गरज असते. मुंबईसारख्या महानगरात येऊन छोट्या गावातली किंवा शहरातली मुलं बुजून जातात. प्रतिभा असून मागे पडतात. अशावेळी मुंबईत करीयर करायला जाताना त्यांना ग्रुमिंग करण्याची आवश्यकता असल्याचं मला भासलं. आणि मर्म म्युझिक अकादमीचा जन्म झाला.”ह्या अकदामीचा शुभारंभ झाल्यावर ‘रोहित राऊत-जुईली जोगळेकर लाइव इन कॉन्सर्ट’चे आयोजन लातुरमध्ये करण्यात आले होते. रोहित म्हणतो,”ह्या कॉन्सर्टला रसिकांचा भरूभरून प्रतिसाद मिळाला. ब-याचदा असं होते की, कलाकार मोठा झाल्यावर तो जन्मगावी जाणे कमी करतो. तसं माझ्याबाबतीत होऊ नये, हा माझा यामागचा मुळं उद्देश होता. मला माझ्या मातीसाठी काहीतरी करण्याची खुप इच्छा होती. रोहित राऊत फाऊंडेशनव्दारे मी अशापध्दतीने समाजाची परतफेड करण्याचा माझा प्रयत्न राहिल.”  




रोहित राऊतने अगदी लहान वयापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'सारेगमपा' लिटल चॅम्पस या कार्यक्रमात तो स्पर्धक म्हणून झळकला होता. त्याचा आवाज प्रेक्षकांना खूपच आवडला होती. याच कार्यक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. अखेरच्या पाच स्पर्धकांपर्यंत त्याने मजल मारली होती. त्यानंतर तो हिंदी सारेगमामध्येदेखील झळकला. या कार्यक्रमाद्वारेदेखील त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.या दोन्ही रिअॅलिटी शोमुळे रोहितला मराठी इंडस्ट्रीत चांगलाच ब्रेक मिळाला. आज त्याने मराठी चित्रपटांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. गायनामध्ये यश मिळाल्यानंतर रोहित राऊत आता सूत्रसंचालनाकडे वळला आहे. संगीत सम्राट हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात रोहित प्रेक्षकांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेतही तो पाहायला मिळाला होता.
 

Web Title: Rohit Raut started Marma Music Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.