रोहित शेट्टी करणार झाला बोभाटाचा रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2016 12:23 PM2016-12-26T12:23:03+5:302016-12-26T12:23:03+5:30

अनेक मराठी चित्रपटांचे आता हिंदी रिमेकही होऊ लागले आहेत. मराठी चित्रपट हा आशयप्रधान असल्याने आता तो बॉलिवूडवाल्यांना देखील खुणावू ...

Rohit Shetty will do a remake of Bobabhata | रोहित शेट्टी करणार झाला बोभाटाचा रिमेक

रोहित शेट्टी करणार झाला बोभाटाचा रिमेक

googlenewsNext
ेक मराठी चित्रपटांचे आता हिंदी रिमेकही होऊ लागले आहेत. मराठी चित्रपट हा आशयप्रधान असल्याने आता तो बॉलिवूडवाल्यांना देखील खुणावू लागला आहे. सैराट, पोश्टर बॉय, नटरंग, दे धक्का या चित्रपटांच्या पक्तींतच आता झाला बोभाटा हा चित्रपट देशील सामील होणार आहे. होय,   दिग्दर्शक रोहित शेट्टी अभिनेता अजय देवगनला घेऊन झाला बोभाटा या मराठी सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याचे समजतेय. झाला बोभाटा हा चित्रपट अजुन प्रदर्शित देखील झाला नाही. तेवढ्यातच या सिनेमाचा हिंदी रिमेक हाणार असल्याचा बोभाटा ऐकु येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून रोहित शेट्टी भारावून गेला. त्यानंतर त्याने याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय.  अजय देवगन आणि रोहित शेट्टी ही जोडी बॉलिवूडमध्ये चांगलीच गाजली आहे. या दोघांनीही अनेक सुपरहिट चित्रपट फिल्म इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यांच्या गोलमान सीरिजचे तर चाहते दिवाने आहेत. याच चित्रपटाच्या म्हणजे, गोलमाल अगेनच्या सध्या ते तयारीत आहेत. झाला बोभाटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रोहित शेट्टीने संपूर्ण सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर  केवळ रोहितसाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर रोहित शेट्टीने या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. झाला बोभाटा येत्या ६जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर रोहित शेट्टी या सिनेमाचे हक्क विकत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच एका मराठमोळ््या चित्रपटाचा हिंदी तडका पाहण्यासाठी तुम्ही देखील सज्ज व्हा. या चित्रपटाचा रिमेक रोहित कशाप्रकारे करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Rohit Shetty will do a remake of Bobabhata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.