बिग बी साकारणार नागराज मंजुळेच्या सिनेमात भूमिका, लवकरच शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 11:22 AM2018-02-02T11:22:15+5:302018-02-02T16:52:15+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह, महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर रसिक जीव ओवाळून टाकतात. बिग बीसुद्धा रसिकांना कधीच निराश ...

Role of Nagraj Manjule in Big B, he will start shooting soon | बिग बी साकारणार नागराज मंजुळेच्या सिनेमात भूमिका, लवकरच शूटिंगला सुरुवात

बिग बी साकारणार नागराज मंजुळेच्या सिनेमात भूमिका, लवकरच शूटिंगला सुरुवात

googlenewsNext
ंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह, महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर रसिक जीव ओवाळून टाकतात. बिग बीसुद्धा रसिकांना कधीच निराश करत नाहीत.त्याच्या प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करतात. त्यांच्या कामावरील याच निष्ठेमुळे वयाची 75 ओलांडल्यानंतरही बॉलिवूडचे सगळ्यात बिझी अभिनेता अशी त्यांची ओळख आहे.आजच्या पीढीच्या तरुण अभिनेत्यांनाही लाजवेल असा उत्साह आणि कामावरील प्रेम, निष्ठा थक्क करणारा म्हणावा लागेल.त्यामुळेच आजही निर्माते दिग्दर्शक बिग बी यांना लक्षात घेऊन सिनेमाची कथा लिहतात. कलाकाराला लक्षात घेऊन कथा लिहली जाणारे बिग बी चित्रपटसृष्टीत एकमेव कलाकार असावेत.त्यामुळेच आजही ते काम करत असलेल्या सिनेमांची यादी भलीमोठी असते.सध्या ते मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानसह 'ठग्स ऑफ हिंदोस्ता' या सिनेमात बिझी आहेत.या सिनेमाचं शूटिंग अंतिम टप्प्यात आले आहे.याशिवाय अभिनेता ऋषी कपूर यांच्यासह ते '102 नॉट आऊट' या सिनेमात ते काम करत आहे.याशिवाय मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळेसह बिग बी सिनेमा करणार आहेत.नागराजच्या 'सैराट'ने मराठी रसिकांसह बॉलिवूडवरही जादू केली होती.नागराजचे सा-यांनीच कौतुक केले होते.नागराजचं कौतुक करणा-यांमध्ये बिग बी अमिताभ यांचा समावेश होता.बिग बींनी 'सैराट' सिनेमा आणि नागराजचे तोंडभरुन कौतुक केले होते. आता हाच नागराज मंजुळे बिग बींसह काम करणार आहे.बिग बींसह काम करण्याची अनेकांची इच्छा असते.त्याच्या आगामी 'झुंड' या सिनेमाचे निमित्ताने जणू त्याचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे.कारण या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन झळकणार आहेत.लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्ता' या सिनेमाची शूटिंग अंतिम टप्प्यात आली आहे.या सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर बिग बी नागराज मंजुळेच्या 'झुंड' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.खुद्द बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवरुन ही माहिती दिली आहे.नागराजचा 'झुंड' हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे.या सिनेमात बिग बी झळकत आहेत.त्यामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या करियरमधील हा सुवर्णक्षण म्हटल्यास वावगे ठरु नये.

Web Title: Role of Nagraj Manjule in Big B, he will start shooting soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.