मयूरेश पेम साकारणार रोमँण्टिक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 01:44 PM2017-01-01T13:44:40+5:302017-01-01T13:44:40+5:30

 अनुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा हा चित्रपटाची चर्चा सोशलमीडियावर जोर धरू लागली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ६ जानेवारीला चित्रपटगृहात ...

Romantic role to play the Peacock Pém | मयूरेश पेम साकारणार रोमँण्टिक भूमिका

मयूरेश पेम साकारणार रोमँण्टिक भूमिका

googlenewsNext
 
नुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा हा चित्रपटाची चर्चा सोशलमीडियावर जोर धरू लागली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ६ जानेवारीला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मयूरेश पेम आणि मोनालिसा बागल हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेता मयूरेशचा हा पहिलाचा चित्रपट आहे. त्याच्या या पहिल्या चित्रपटाविषयी मयूरेश पेम लोमकत सीएनएक्सला सांगतो, या चित्रपटात मी पशा नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. तो एक ग्रामीण भागातील मुलगा आहे. तसेच तो या चित्रपटात रोमॅण्टिक मुलगा दाखविण्यात आला आहे. त्याला चित्रपट आणि नाटक पाहण्याची खूपच आवड असते. त्यामुळे त्याची एक वेगळीच फिल्मी दुनिया असते. तसेच तो गावात सगळयांना मदत करत असतो. त्यामुळे तो गावात सगळयांचा आवडता असतो. मात्र तो गावातील एका मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र ती मुलगी त्याच्या प्रेमाला नकार देते. त्याचे पुढे काय होते हे कळण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल. तसेच हा माझा पहिला चित्रपट आहे. म्हणून मी खूप उत्साही आणि आनंदी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. तसेच यापूर्वी मी नाटक केले आहे. त्यामुळे कॅमेरासमोर कसा अभिनय करणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाले. या चित्रपटात माझ्यासोबत  दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, कमलेश सावंत, संजय खापरे हे कलाकार आहेत. त्यामुळे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. तसेच त्यांनी खूप मार्गदर्शनदेखील केले आहे असेदेखील तो यावेळी म्हणाला. या चित्रपटातील मयूरेश आणि मोनालिसा यांच्यावर चित्रिकरण करण्यात आलेले पैजण हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या गाण्याने सोशलमीडियावर खूपच कल्ला करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या गाण्याने फारच कमी वेळात जास्त व्हूज मिळविले आहे. 






Web Title: Romantic role to play the Peacock Pém

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.