रू. ६० लाख डिपॉझिट आणि 10 लाख मासिक भाडं..., आस्ताद काळेची पोस्ट नेमकी कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:07 PM2021-12-16T15:07:25+5:302021-12-16T15:09:57+5:30

Aastad Kale's post : मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय आणि कमेंट्स तर विचारू नका. आस्तादच्या या पोस्टवर चाहत्यांनी भारी कमेंट्स केल्या आहेत.

Rs. 60 lakh deposit and 10 lakh monthly rent ..., Aastad Kale's post viral on social media | रू. ६० लाख डिपॉझिट आणि 10 लाख मासिक भाडं..., आस्ताद काळेची पोस्ट नेमकी कोणासाठी?

रू. ६० लाख डिपॉझिट आणि 10 लाख मासिक भाडं..., आस्ताद काळेची पोस्ट नेमकी कोणासाठी?

googlenewsNext

मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेची एक पोस्ट (Aastad Kale's post ) सध्या चांगलीच व्हायरल होतेय आणि कमेंट्स तर विचारू नका. आस्तादच्या या पोस्टवर चाहत्यांनी भारी कमेंट्स केल्या आहेत. आस्तादच्या पोस्ट तशाही भारी असतात. कधी हळूच टोमणा, कधी उपरोधिक शेरा अशा त्याच्या पोस्ट क्षणात व्हायरल होतात. आत्ताची त्याची ताजी पोस्टही तशीच.

‘रु.६० लाख deposit, आणि रु.१० लाख मासिक भाडं भरून राहाण्यापेक्षा घर विकत घेणं अधिक बरं नाही का??’ अशी एक पोस्ट आस्तादने फेसबुकवर केली आहे. विशेष म्हणजे, हे आकडे माझ्याशी संबंधित नाहीत, हे त्याने आवर्जुन नोंदवलं आहे. पण चाहते हुश्शार...! त्यांनी आस्तादचा ‘इशारा’ कोणाकडे आहे, हे अगदी नेमकं हेरलं आहे.

‘हाच प्रश्न मी बातमी वाचल्यापासून विचारतोय, १.८ करोडची उलाढाल. नाही म्हटलं तरी जुहूमध्ये उच्च प्रतीचे घर नक्कीच मिळेल. पण भाड्याची जागा ऐसपैस आहे म्हणून हा खटाटोप असेल. मिमी म्हणे,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. आता ही ‘मिमी’ कोण? हे सांगायला नकोच. अर्थात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन. होय, चाहत्यांनी आस्तादच्या पोस्ट नेमका संबंध क्रिती सॅननशी जोडला आहे.

रिपोर्टनुसार, क्रितीनं अमिताभ बच्चन यांचा अंधेरी भागातील एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला आहे आणि यासाठी दोन वर्षांचा करार केला आहे. या घरासाठी क्रिती दरमहा १० लाख भाडं देणार आहे म्हणे. सिक्युरिटीपोटी यासाठ तिने ६० लाख रूपये भरल्याचंही कळतंय. अशात आस्तादच्या पोस्टचा थेट संबंध क्रितीशी जोडला जाणारचं...

आस्तादच्या या पोस्ट अन्य चाहत्यांनीही वेगवेगळ्या व मजेदार कमेंट्स केल्या आहेत. ‘देणा-याचं माहित नाही, पण घेणारा मी असतो तर आयुष्यात किती मज्जा आली असती ना...,’ अशी कमेंट एकाने केली आहे. अन्य एकाने, ‘मी रिअल इस्टेटचे काम करतो. असा ग्राहक असेन तर कळवा,’ अशी मजेदार कमेंट केली आहे.

Web Title: Rs. 60 lakh deposit and 10 lakh monthly rent ..., Aastad Kale's post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.