हँसती रहें,तू हँसती रहें! आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:37 IST2024-05-15T17:37:10+5:302024-05-15T17:37:36+5:30
Aarya Ambekar: आर्याच्या साधेपणाचं नेटकरी कायमच कौतुक करत असतात. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना कायमच आवडतो.

हँसती रहें,तू हँसती रहें! आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते घायाळ
'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम आर्या आंबेकर (Arya Ambekar) आज अनेकांची क्रश आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही तितकीच अफाट आहे. म्हणूनच आर्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असल्याचं दिसून येतं. आर्याने तिच्या गोड आवाजासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चाहत्यांना भुरळ पाडली आहे. त्यामुळे 'ब्युटी विथ ब्रेन' असंही तिला म्हटलं जातं. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आर्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे.
आर्याच्या साधेपणाचं नेटकरी कायमच कौतुक करत असतात. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना कायमच आवडतो. मात्र, यावेळी तिने केलेला लूक एकदम खास आहे. आर्याने पांढऱ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
दरम्यान, आर्याने तिचे फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. या लूकमध्ये आर्याने तिच्या सिंपल आणि गोड लूकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्पच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली आर्या आज मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका आहे. तिने अनेक मालिका, सिनेमा आणि म्युझिक अल्बमसाठी गाणी गायली आहेत.