Birthday Special : बर्थ डेच्या दिवशी सावनीने केले असे काही, वाचून तुम्ही म्हणाल जिंकलंस पोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:35 PM2019-07-22T14:35:09+5:302019-07-22T14:35:37+5:30

गायिका सावनी रविंद्रचा आज वाढदिवस आहे. संवेदनशील गायिका सावनी आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

Saavani ravindra celebrate her birthday with cancer patients | Birthday Special : बर्थ डेच्या दिवशी सावनीने केले असे काही, वाचून तुम्ही म्हणाल जिंकलंस पोरी

Birthday Special : बर्थ डेच्या दिवशी सावनीने केले असे काही, वाचून तुम्ही म्हणाल जिंकलंस पोरी

googlenewsNext

गायिका सावनी रविंद्रचा आज वाढदिवस आहे. संवेदनशील गायिका सावनी आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. सावनीने आपला वाढदिवस मुंबईतल्या कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. या आधी सावनीने वाढदिवसाच्या दिवशी पुण्यातल्या मातोश्री वृध्दाश्रमात जाऊन साजरा करत होती. यंदा आपला वाढदिवस सावनीने मुंबईतल्या  ‘सुलभा स्पेशल स्कुल’ मध्ये जाऊन साजरा केला.

सावनी रविंद्र अशा वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याबाबत सांगते, “फक्त पार्टी करून आणि गिफ्ट्स घेऊन वाढदिवस साजरा करणे, मला कधीच आवडले नाही. माझ्या वाढदिवशी कोणातरी गरजू व्यक्तिच्या चेह-यावर हसु फुलवावे, आणि त्या व्यक्तिला आवश्यक भेटवस्तू द्यावी असे मला फार पुर्वी पासूनच वाटायचे आणि मग त्यातूनच मी वाढदिवस अशा वेगळ्या पध्दतीने दरवर्षी साजरा करयचा संकल्प सोडला. जो दरवर्षी मी पूर्णही करतेय, ह्याचा अर्थातच मला आनंद आहे.”

सुलभा स्पेशल स्कूलच्या विद्यर्थ्यांसोबत वेळ घालवल्याच्या अनुभवाबद्दल सावनी सांगते, “खरं तर मी ह्या विद्यार्थ्यांना सरप्राइज द्यायला इथे आले होते. पण त्यांनी तर मलाच सरप्राइज केले. माझ्यासाठी त्यांनी गाणी गायली, डान्स केला. त्यांच्यातली निरागसता मला खूप भावली. त्यांचे निखळ हास्य माझ्या वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत करून गेला. त्यांनी दिलेली उर्जा आता वर्षभर चांगलं काम करण्याची उमेद मला देत राहिल.”

Web Title: Saavani ravindra celebrate her birthday with cancer patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.