'सावट' चित्रपटाचे रहस्य 22 मार्चला उलगडणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 07:15 AM2019-01-12T07:15:00+5:302019-01-12T07:15:00+5:30

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Saavat' film release on 22nd march in theatre | 'सावट' चित्रपटाचे रहस्य 22 मार्चला उलगडणार रुपेरी पडद्यावर

'सावट' चित्रपटाचे रहस्य 22 मार्चला उलगडणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा हा चित्रपट आहे हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला  संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे

ब-याचदा चित्रपटाचे कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट योग्य-अयोग्याच्या पलिकडिल गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अनाउन्समेन्ट पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करत आहे. 

ह्याविषयी 'सावट'ची निर्माती हितेशा देशपांडे म्हणते, ''आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिश्यात दुभंगला आहे. एककिडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळ-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो. मोबाईल आज गावागावात पोहोचला पण भूत-प्रेत, जादु-टोणा, चेटूक ह्यामूळे आजही आपण अंधश्रध्देच्या कचाट्यातून बाहेर पडलेलो नाही आहोत. ह्यावरच सिनेमामधून भाष्य केले आहे. पण हे करताना कुठेही उपदेशाचा डोस न पाजता दिग्दर्शक तुम्हांला सलग दोन तास खुर्चीला खिळवून ठेवतो.” चित्रपटात असणाऱ्या गूढ,थरारक कथेचा आणि दृशांचा एकंदरीत गडद अंदाज पोस्टरवरून बांधता येत आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणतात, “सावटचे कथानक हे आपल्या सर्वांमधल्या नकारात्मकतेचे प्रतिक आहे. आपला समाज आपल्याला ब-याचदा रूढींची पडताळणी न करता त्या पाळायला भाग पाळतो. सावटची कथा श्रध्दा आणि अंधश्रध्देच्या किना-यावर असलेल्या ह्या समजूतींवर भाष्य करते. ह्या गुढकथेमधली पात्र तुम्हांला ह्या चित्तथरारक प्रवासात खिळवून ठेवतात.”

निरक्ष फिल्मच्या सहयोगाने लेटरल वर्क्स प्रा.लि.प्रस्तुत, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटात स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला  संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. 
 

Web Title: 'Saavat' film release on 22nd march in theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Saavat Movieसावट