सचिन खेडेकर यांचा आज वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 04:03 PM2017-01-01T16:03:53+5:302017-01-01T16:06:14+5:30
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सचिन खेडेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्यांसाठी हा दिवस डबलधमाकाच म्हणावा लागेल. ...
आ ल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सचिन खेडेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्यांसाठी हा दिवस डबलधमाकाच म्हणावा लागेल. कारण आज नवीन वर्षदेखील सुरू झाले आहे. सचिने खेडेकर यांनी बॉलिवुड आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटविला आहे. त्याचप्रमाणे त्यांंनी छोटया पडदयावरूनदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
सचिन खेडेकर यांचा जीवा सखा हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचा हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे.
मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे.
सचिन खेडेकर यांनी बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. या मालिकेत त्यांच्यासोबत रेणुका शहाणे आणि अजिंक्य देवदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता.
रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.
त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती.
कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.