लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 04:53 PM2024-08-16T16:53:03+5:302024-08-16T16:53:46+5:30

दोघांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण होणार आहेत. नुकतंच या जोडीने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.

Sachin Pilgaonkar had two conditions before marriage which were fulfilled as soon as Supriya met him | लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण

लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) ही मराठीतील एव्हरग्रीन जोडी. 70-80 च्या दशकात दोघांनी मिळून अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आजही ही जोडी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.  'नवरा माझा नवसाचा', 'अशी ही बनवा बनवी', 'माझा पती करोडपती', 'नवरी मिळे नवऱ्याला' असे एकापेक्षा एक चित्रपट गाजले. पडद्यावरची ही लोकप्रिय जोडी नंतर खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडली. दोघांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण होणार आहेत. नुकतंच या जोडीने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांच्यात १० वर्षांचं अंतर आहे. सुप्रियाशी लग्न करण्यापूर्वी सचिन पिळगांवकरांच्या दोन अटी होत्या ज्या त्यांनी मुलाखतीत सांगितल्या. ते म्हणाले, "मला सुप्रिया आवडली होती हे महत्वाचं होतं. पण हिच्याशीच लग्न केलं पाहिजे हे मी तिच्या आई वडिलांना भेटल्यानंतर ठरवलं. त्यांनी हिच्यावर केलेले संस्कार हे त्यांना भेटल्यावर मला समजले. मला अशीच मुलगी हवी होती जी संस्कारीच असेल. तसंच मी ठरवलं होतं की मराठी मुलीशीच लग्न करणार आणि दुसरं म्हणजे मी अरेंज मॅरेज करणार नाही."

"आपल्या पद्धती, रितीरिवाज मला खूप आवडतात. त्या फक्त माझ्या नाही तर कुटुंबाच्या आहेत. मी अमराठी लोकांच्या विरोधात आहे असं अजिबात नाही. पण माझ्याकडून तसा प्रयत्न असावा की मराठी मुलगीच हवी या मताचा मी होतो. शेवटी आपल्या हातात काही नसतं जे नशिबाच आहे तेच होतं. देवाच्या कृपेने तसंच झालं."

Web Title: Sachin Pilgaonkar had two conditions before marriage which were fulfilled as soon as Supriya met him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.