बिग बींनाही सिनिअर आहेत सचिन पिळगांवकर, पण महागुरु म्हणतात, " तुमचं काम..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 10:34 AM2023-06-04T10:34:12+5:302023-06-04T10:34:53+5:30

सचिन पिळगांवकर यांना मनोरंजनसृष्टीत तब्बल ६० वर्ष झाली.

sachin pilgaonkar is senior to amitabh bachchan but says dosent matter how long you work but what you work | बिग बींनाही सिनिअर आहेत सचिन पिळगांवकर, पण महागुरु म्हणतात, " तुमचं काम..."

बिग बींनाही सिनिअर आहेत सचिन पिळगांवकर, पण महागुरु म्हणतात, " तुमचं काम..."

googlenewsNext

चिरतरुण व्यक्तिमत्व सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) हे मराठी कलाविश्वातील महानायकच आहेत. ते अभिनेतेही आहेत, निर्मातेही आहेत, उत्तम गायक आणि डान्सरही आहेत. एकूणच काय तर ऑलराऊंडर आहेत म्हणूनच त्यांना महागुरु म्हटलं जातं. 65 वर्षांचे सचिन पिळगांवकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षीच अभिनयात पदार्पण केलं. आजही ते मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून त्यांच्या कारकिर्दीचं हे 60 वं वर्ष आहे. मग तसं बघायला गेलं तर महागुरु हे बॉलिवूडच्या महानायकालाही सिनिअर आहेत. यावर सचिन पिळगांवकर यांनी अतिशय प्रभावीपणे उत्तर दिलंय.

सचिन पिळगांवकर आणि त्यांची लेक श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सूत्रसंचालक सचिन खेडेकर म्हणाले, तुम्ही तर अमिताभ बच्चन यांनाही सिनिअर आहात. तेव्हा सचिन पिळगांवकर म्हणाले, "परमेश्वराची कृपा आहे. मी समजतो की, सिनिओरिटी आहे आणि महत्वाची असते सगळं ठीक आहे. पण त्याचबरोबर तुम्ही काम काय करता, तुम्ही ते इतक्या वर्षात करता की दहा वर्षात करता, काम महत्वाचंय. वर्ष महत्वाची नाहीयेत, असं मला वाटतं."

सचिन पिळगांवकर यांच्या या उत्तराने सर्वांचंच मन जिंकलं. ते मराठी सोबतच हिंदीतही लोकप्रिय होते.  बिग बी अमिताभ बच्चन आणि सचिन पिळगांवकर यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यातच सर्वांना लक्षात असलेला सुपरहिट 'शोले' चित्रपट. यासोबतच 'सत्ते पे सत्ता','त्रिशूल' अशा सुपरहिट सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे.

Web Title: sachin pilgaonkar is senior to amitabh bachchan but says dosent matter how long you work but what you work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.