'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, "अशी ही बनवाबनवी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:52 IST2023-08-24T16:50:24+5:302023-08-24T16:52:20+5:30
लक्ष्मीकांतचा हा फोटो अपलोड करत महागुरुंनीही मजेदार पोस्ट केली आहे.

'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, "अशी ही बनवाबनवी..."
चंद्रयान 3 (Chandrayaan 3) यशस्वी झाल्यानंतर भारतभर आनंद व्यक्त केला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रवेश करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. ISRO च्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून भारतीयांना कमालीचा आनंद झाला आहे. प्रत्येकाने सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. महागुरु सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी आज फेसबुकवर विनोदी पोस्ट केली आहे.
चंद्रयान 3 ने अवकाशात उड्डाण केल्यानंतर सोशल मीडियावर एक विनोदी पोस्ट व्हायरल होत होती. ती पोस्ट आहे मराठीतील सुपरहिट चित्रपट 'अशी ही बनवाबनवी' ची. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे जो पार्वती बनलेला असतो त्याच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम असतो. तेव्हा त्याला चंद्रावर बसवण्यात आल्याचा तो फोटो आहे. बनवाबनवी सिनेमाचे अनेक सीन्स, डायलॉग व्हायरल होत असतात. लक्ष्मीकांतचा हा फोटो अपलोड करत महागुरुंनीही मजेदार पोस्ट केली आहे. ते लिहितात, 'चंद्रावर बसणारा पहिला भारतीय'
सचिन पिळगांवकरांची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत लक्ष्याची आठवण काढली आहे. सध्या महागुरुंची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. महागुरुंनी मागील आठवड्यात ६६ वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्यांची लेक श्रिया पिळगांवकर ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.